सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे बाजारभाव

विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापसाचे आजचे बाजारभाव जाणून घ्या.
Soybean and cotton daily rates
Soybean and cotton daily rates

विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोयाबीनची 3500 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला किमान 5450 रुपये तर कमाल 5900 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5775 हजार रुपयांवर होता. तर अमरावती बाजार समितीत सोयाबीनची 4993 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5700 रुपये होता. तर कमाल भाव 6200 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 5950 चा भाव मिळालाय. शेजारी अकोला बाजारात आवक मालाला किमान 5000 तर कमाल 6930 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 6000 रुपयांचा होता. तसंच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 6,363 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 6,423 रुपयांचा दर  मिळाल्याचं NCDEX च्या वेबसाईटवरून कळतं.

मराठवाडा सोयाबीन बाजारभाव (Marathwada soybean market rate) -  हिंगोली बाजारात आज सोयाबीनची 699 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5699 रुपये तर कमाल 6116 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5907 हजार रुपयांवर होता. तर मानवत बाजारात आवक मालाला किमान 5700 तर कमाल 6400 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 6150 रुपयांचा होता. दुसरीकडे अंबेजोगाई बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 5500 रुपये तर कमाल 6200 रुपयांचा दर होता. या मालाला सर्वसाधारण 6050 होता.

विदर्भ कापूस बाजारभाव (Vidarbha cotton market rate) - आज देऊळगाव राजा बाजारात कापसाची 3000 क्विंटल आवक झालीये. आवक मालाला किमान 9500 तर कमाल 9850 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 9650 चा होता. त्याचबरोबर राळेगाव बाजारात कापसाची आज 3700 क्विंटल आवक झाली. आवक मालाला 9000 रुपयांचा किमान तर 10095 चा कमाल भाव राहिलाय. तसंच सर्वसाधारण भाव 10000 रुपये होता. आपल्या भागात कापसाला किती भाव मिळाला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

हा व्हिडिओ पाहिलात का? : 

मराठवाडा कापूस बाजारभाव (Marathwada cotton market rate) -  आज मानवत बाजारात कापसाची 4000 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 8200 तर कमाल 9950 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 9860 चा होता. तर हिंगोली बाजारात आलेल्या 46 क्विंटल कापसाला 9600 ते 9750 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 9675 रुपये होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com