Food Grain Production : अन्नधान्य उत्पादनात ३.९१ टक्क्यांनी घट

संततधार पावसामुळे देशात यंदा अन्नधान्य उत्पादन प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०२१-२२ या वर्षात १५.१६ कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते.
Food Grain Production
Food Grain ProductionAgrowon

नागपूर : संततधार पावसामुळे देशात यंदा अन्नधान्य उत्पादन (India Food Grain Production) प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०२१-२२ या वर्षात १५.१६ कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन (Food Grain Production) झाले होते. यावर्षी त्यात ३.९१ टक्के घट होऊन ते १४.९९ कोटी टन इतके राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Food Grain Production
Food Grain : कमी पावसामुळे धान्य उत्पादन कमी होणार?

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या संभावित अंदाजानुसार, यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन १०.४९ कोटी टन होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात तांदळाचे उत्पादन १०.५२ कोटी टन इतके होते. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळवर्गीय पिकांचे उत्पादन ८३.७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. २०२१-२२ या वर्षातील चौथ्या अनुमानानुसार यावर्षी देखील तितकीच उत्पादकता होईल, अशी शक्यता आहे.

खरीप हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असलेल्या तुरीच्या उत्पादकतेत मात्र यंदा घट होईल असेही भाकीत वर्तविण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ४३.४ लाख टन तुरीचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र संततधार पाऊस, अतिवृष्टी व वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलाचा फटका या पिकाला बसला आहे.

Food Grain Production
Wheat Production : युरोपियन युनियनमध्ये मका, गहू उत्पादन घटणार?

त्यामुळेच देशभरात तुरीची उत्पादकता प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून त्यानुसार यंदाच्या खरिपात तुरीची उत्पादकता कमी होऊन ती ३८.९ लाख टन इतकी राहील. नैसर्गिक आपत्तीमुळे उडीदाची उत्पादकता देखील प्रभावित झाली आहे. उडीदाचे उत्पादन देखील चालू खरीप हंगामात कमी होऊन ते गेल्या वर्षीच्या १९.४ लाख टनांवरून १८.४ लाख टन इतके राहील, अशी शक्यता आहे.

कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, तेलबियावर्गीय पिकाची उत्पादकता देखील पाऊस आणि नैसर्गिक कारणामुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळेच तेलबियावर्गीय प्रमुख पिकांची उत्पादकता गेल्या वर्षीच्या २३८.८८ लाख टनांवरून २३५.७३ लाख टन इतकी मर्यादित राहील, असा अंदाज आहे. तेलबियावर्गीय पिकातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे उत्पादन १२८.९२ लाख टन तर भुईमूग शेंगाचे उत्पादन ८३.६९ लाख टन इतके राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन १२९.९५ लाख टन तर भुईमूग शेंग ८३.७५ लाख टन इतके उत्पादन होते. एरंडी बियांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या १६.११ लाख टनांवरून यावर्षी १५.८ लाख टन इतके राहील. ज्वारी, बाजरा तसेच मक्याबाबतही या अहवालात अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या हंगामात ज्वारीचे १५.९ लाख टन उत्पादन झाले होते. यावर्षी त्यात वाढ होत ते १६.९ लाख टनावर पोहोचेल. बाजरा ९६.२ लाख टनांवरून ९७.५ लाख टन तर मका २२६.३ लाख टनांवरून २३१ लाख टनावर पोहोचेल अशी शक्यता आहे.

कापसाचे लागवड क्षेत्र यावर्षी सरासरी इतके राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. सोयाबीनच्या दरात आलेल्या तेजीच्या परिणामी हे घडले होते. यंदा मात्र कापसाचे लागवड क्षेत्र १२९ ते १३० लाख हेक्टरवर पोहोचल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ३१२.३ लाख गाठींचे उत्पादन झाले असताना या वर्षी त्यात वाढ होत ३४१.९० लाख गाठ कापसाचे उत्पादन होईल, असाही अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्तविला आहे.

अशी राहील उत्पादकता २०२१-२२ व २०२२-२३ (लाख टन)

तांदूळ : १०.५२--१०.४९ (कोटी टन)

तूर : ४३.४--३८.९

उडीद : १९.४--१८.४

सोयाबीन : १२९.९५--१२८.९२

भुईमूग शेंग : ८३.७५--८३.६९

एरंडी : १६.११--१५.८

ज्वारी : १५.९--१६.९

बाजरा : ९६.२--९७.५

मका : २२६.३--२३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com