
हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (Hingoli APMC) शनिवारी (ता. १७) सोयाबीनची ८०६ क्विंटल आवक (Soybean Arrival) होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५५३५ रुपये, (Soybean Rate) तर सरासरी ५२१७ रुपये दर मिळाले.
हिंगोली बाजार समितीत सोमवार (ता. १२) ते शनिवार (ता. १७) या कालावधीत सोयाबीनची ५१३० आवक झाली, तर प्रतिक्विंटल सरासरी ५२१७ ते ५४०४ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १६) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५१९५ ते कमाल ५६२५ रुपये, तर सरासरी ५४१० रुपये दर मिळाले.
गुरुवारी (ता. १५) सोयाबीनची ८९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५०९९ ते कमाल ५७१० रुपये, तर सरासरी ५४०४ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १४) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५६२० रुपये, तर सरासरी ५३३५ रुपये दर मिळाले.
मंगळवारी (ता. १३) सोयाबीनची ८३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५६०४ रुपये, तर सरासरी ५३०२ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १२) सोयाबीनची ११९५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५६८० रुपये दर मिळाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.