
डॉ. अरुण कुलकर्णी
फ्यूचर्स किमती : सप्ताह- १५ ते २१ एप्रिल २०२३
गेल्या सप्ताहाप्रमाणे या सप्ताहातसुद्धा बहुतेक सर्व वस्तूंच्या किमती कमी झाल्या. मक्यामध्ये गेल्या सप्ताहात १३ टक्क्यांनी किमती घसरल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.५ टक्क्यांनी घसरल्या. हरभऱ्याच्या किमती स्थिर राहिल्या.
किमती कमी होण्यामागे मुख्यतः रब्बीची आवक आवक कारणीभूत आहे. एप्रिल महिन्यात मका, हळद, हरभरा व कांदा यांची आवक वाढत आहे. सोयाबीनची आवकही वाढली आहे.
कापसाची आवक कमी झाली होती; पण गेल्या दोन सप्ताहांत ती परत वाढली. मका व हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मेमध्ये मॉन्सूनचा सुधारित अंदाज हवामान विभागाकडून जाहीर होईल. त्याचा शेतीमालाच्या किमतींवर परिणाम होईल.
२१ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६२,५४० वर आले होते. या सप्ताहात ते ०.३ टक्क्याने घसरून रु. ६२,३६० वर आले आहेत. जून फ्यूचर्स भाव ०.५ टक्क्याने घसरून रु. ६३,९०० वर आले आहेत. ऑगस्ट
फ्यूचर्स रु. ६३,००० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १ टक्क्याने अधिक आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. या सप्ताहात त्या पुन्हा ३.५ टक्क्यांनी घसरून रु. १,९२० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (मे डिलिव्हरी) किमतीसुद्धा ३.७ टक्क्यांनी घसरून रु. १,९३१ वर आल्या आहेत.
जुलै फ्यूचर्स किमती रु. १९५४ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.८ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,९६२ आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती मार्च महिन्यात रु. ६,७९० ते रु. ७,००० या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. गेल्या सप्ताहात त्या रु. ६,७७१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने वाढून रु. ६,७९५ वर आल्या आहेत.
मे फ्यूचर्स किमती २.७ टक्क्यांनी घसरून रु. ६,७१२ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. ६,८०२ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ०.१ टक्क्याने अधिक आहेत.
आवक गेल्या महिन्याच्या मध्यापर्यंत वाढत होती; नंतर ती परत कमी होत होती. १४ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात मात्र ती पुन्हा वाढली.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३ टक्क्यांनी घसरून रु. ४,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. ४,८०० वर कायम आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.
आवक वाढू लागली आहे. सध्या ती साप्ताहिक १ लाख टन आहे. आवकेचा परिणाम किमतींवर दिसत आहे.
मूग
मुगाच्या किमती मार्च महिन्यात घसरत होत्या. एप्रिलमध्येही ही घसरण चालू आहे. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात १.७ टक्का घसरून रु. ८,६०० वर आली आहे. आवक कमी होत आहे.
सोयाबीन
सोयाबीनच्या स्पॉट किमती मार्च महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) ०.९ टक्क्याने घसरून रु. ५,४५४ वर आली होती. या सप्ताहात ती १.९ टक्क्याने घसरून रु. ५,३५३ वर आली आहे.
सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. सोयाबीनची आवक कमी होत होती; पण गेल्या दोन सप्ताहांत ती वाढलेली आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात १.२ टक्क्याने घसरून रु. ७,९६७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल, कापसाची किंमत प्रती खंडी (३५५.५६ किलो), कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
लेखक - arun.cqr@gmail.com
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.