Cotton Market: कापूस उत्पादनात घट, निर्यातीमुळे बाजाराला आधार

देशातील कापूस उत्पादन घटल्याचं आता स्पष्ट झालं. शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापूस उत्पादन कमी झाल्याचं सांगत होते.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Pune News : देशातील कापूस (Cotton) उत्पादन घटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दरात सुधारणा पाहायला मिळात आहे. मागील काही दिवसांपासून अनेक बाजारांमध्ये हळूहळू कापूस दर (Cotton Rate) वाढत आहेत. पण आजही बहुतेक बाजारांमधील किमान दरपातळी ७ हजार रुपयांवर आहेत.

मात्र कापसाची दरवाढ पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील कापूस उत्पादन घटल्याचं आता स्पष्ट झालं. शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापूस उत्पादन कमी झाल्याचं सांगत होते. पण उद्योगानं सुरुवातीला विक्रमी उत्पादन सांगून नंतर अंदाज कमी केले.

आता काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने ३२१ लाख गाठींचा अंदाज व्यक्त केला. तर युएसडीएनं ३२६ लाख गाठी उत्पादन झाल्याचं सांगितलं. तसं पाहीलं तर प्रगत देशांप्रमाणं आपल्याकड अचूक उत्पादन काढण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही.

त्यामुळं कापूस बाजारात येण्याच्या काळात विक्रमी उत्पादन असल्याचं सांगितलं जातं. सरकारची पध्दत लागवड आणि उत्पादकतेवर आधारित आहे. तर शेतकऱ्यांनी किती कापूस विकला? यावरून उद्योग कापसाचं उत्पादन काढतात.

याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसतो. यापुढील काळतही उत्पादनाचे अंदाज कमी होऊ शकतात.

Cotton Market
Cotton Procurement : कापूस महासंघाचा कापूस खरेदीचा प्रस्ताव फेटाळला

कापसाचा कमाल भाव

देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज कमी झाल्यानंतर बाजारातही त्याची प्रतिक्रिया दिसली. कापूस दरात सुधारणा होताना दिसत आहे. काही बाजारांमधील उच्चांकी भाव ८ हजार ८०० रुपयांपर्यंत पोचला.

आज आकोट बाजारात कापसाला ८ हजार ८५० रुपये क्विंटलचा भाव मिळाल्याच्या पावत्या फिरत होत्या. अकोटमध्ये कालही असाच दर मिळाला होता. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी. हा दर सर्वच शेतकऱ्यांना मिळाला नाही. सरासरी दर यापेक्षा कमी होता.

आजची आवक आणि दर

देशात आज १ लाख ३५ हजार गाठी कापूस आवक झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर आज कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला.

महाराष्ट्रातील दरपातळीही याचदरम्यान कायम होती. सरकीचे दरही ३ हजार २०० ते ३ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. मागील काही दिवसांपासून सरकीचेही दर नरमले होते.

वायद्यांमध्ये घट

वायद्यांचा विचार करता सायंकाळी ५ वाजेपर्यंत नरमाई दिसून आली. एप्रिलच्या वायद्यांमध्ये ४४० रुपयांची घट होऊन वायदे ६४ हजार २०० रुपये प्रतिखंडीवर होते. तर जूनच्या वायद्यांमध्ये ४८० रुपयांनी घट होऊन ६४ हजार ६८० रुपयांवर व्यवहार सुरु होते.

सरासरी दरपातळी सुधारतील

देशातील कापूस बाजाराचं चित्र आता स्पष्ट होत आहे. उत्पादनात घट झाल्याचं उद्योगानीही मान्य केलं. तसचं उद्योगांना पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी कापूसही मिळत आहे. बांगलादेश आणि इतर शेजारच्या देशांना निर्यातही सुरु झाली.

यामुळं कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. फेब्रुवारी महिन्यात कापसाचा सरासरी भाव ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो.

हंगामातील दर काय राहतील?

हंगामात म्हणजेच वर्षभर कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये राहील. असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

जाणकारांनी ही दरपातळी देशातील कापूस उत्पादन, शेतकऱ्यांची सध्याची कापूस विक्री, उद्योगांचा वापर, निर्यात, सरकारचं सध्याचं धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती पाहून सांगितली आहे.

ही परिस्थिती बदलली की कापूस दर कमीही होऊ शकतात आणि यापेक्षा जास्त वाढूही शकतात, हे लक्षात घ्यावं. तसचं बाजारातली तेजी मंदीचा फायदा घेता यावा यासाठी टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी. कापूस विक्री करताना बाजाराचा आढावा घ्यावा, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com