
Navi Delhi News : देशातील शेतीमाल आणि पशुधनाच्या दीर्घकालीन मागणी आणि पुरवठ्याचा अंदाज देण्यात येणार आहे.
शेतीमाल आणि पशुधनाची निर्यात, नासाडी कमी करणे, किंमतीवर लक्ष ठेवणे आणि पिकांचा फेरबदल करणे शक्य व्हावे यासाठी निती आयोगाने कार्यगट स्थापन केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळण्यास मदत होईल.
निती आयोगाने देशातील शेतीमाल आणि पशुधानाची मागणी आणि पुरवठ्याचा दीर्घकालीन अंदाज देण्यासाठी पुढाकार घेतला. निती आयोगाने एक कार्यगट त्यासाठी स्थापन केला आहे.
हा कार्यगट पीक उत्पादन, पशुधन, मत्स्योत्पादन आणि कृषी निविष्ठांची २०२५-२६, २०३०-३१ आणि २०३५-३६ मध्ये उपलब्धता आणि मागणी किती राहील याचा अंदाज वर्तविणार आहे, अशी माहिती सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिली.
या कार्यगटाचे अध्यक्ष आयसीएआर-एनआयएपीचे संचालक पी. एस. बिरथल आहेत. हा कार्यगट आपला अहवाल या वर्षात सादर करण्याची शक्यता आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील वर्षापासून उत्पादनात बदल करता येतील.
या अंदाजात शेतीमालाचा उत्पादन खर्चाचाही विचार करणार आहे. यामुळे त्या शेतीमालाची किंवा पशुधानाच्या किमतीवर लक्ष ठेवता येईल. तसेच शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा याचीही काळजी घेता येईल.
दीर्घकालीन अंदाज आवश्यक
कोरोनानंतर जागतिक पातळीवर अनेक स्थित्यंतरे आली. त्यामुळं सरकारला अशा दीर्घकालीन अंदाजाची गरज आहे. कोरोनामुळे जागतिक शेतीमाल आणि पशुधन वापर, उत्पादन, किमती आणि व्यापारात मोठे बदल झाले आहेत.
ग्राहकांची आवडीनिवडीही बदलल्या आहेत. रशिया-युक्रेन युध्दामुळे देशांमधील व्यापार करारही तुटत आहेत. त्यामुळे शेतीमाल व्यापाराला महत्व प्राप्त झाले आहे.
शाश्वत नियोजन महत्वाचे
शेतीमाल, कृषी निविष्ठा, पशुधन आणि मत्स्योत्पादनाचे अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घ कालीन अंदाज गरजेचे आहेत. या अंदाजामुळे अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेल्या शेतीमाल आणि पशुधनाचे शाश्वत नियोजन करता येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.