Vegetable Market Rate : गत आठवड्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ६) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती.
Pune Market Committee
Pune Market CommitteeAgrowon

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) रविवारी (ता. ६) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक (Vegetable Arrival) झाली होती. आवक आणि मागणी (Vegetable Demand) संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर (Vegetable Rate) स्थिर होते. आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, इंदूर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, हिमाचल प्रदेशातून मटार १ आणि कर्नाटकमधून तोतापुरी १ टेम्पो, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे ६ ट्रक आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० पोती, टोमॅटो सुमारे १० हजार क्रेटस, फ्लॉवर, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, हिरवी मिरची, कोबी आणि गाजर प्रत्येकी ५ टेम्पो, मटार ५० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक, आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ७० ट्रक आवक झाली होती.

Pune Market Committee
Market Committee : नांदगाव बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे हाल

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : २००-२८०, बटाटा : १८०-२२०. लसूण : २००-५००, आले : २००-४००, भेंडी : २००- २५०, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : १२०-१६०, दोडका : २८०-३२०, हिरवी मिरची : ३००-३५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २५०-३००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २५०-३००, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : १२०-१६०, कोबी : १२०-१६०, वांगी : ३००-४५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १५०-२००, ढोबळी मिरची : ३५०-४५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : १२००-१४००, गाजर : ३००-३५०, वालवर : ३५०-४००, बीट : १५०-२००, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १५०-१६०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : १२००-१४००, पावटा : ५००- ५५०, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची ५० हजार जुड्यांची आवक झाली होती.पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १५००-१६००, शेपू : ६००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-७००, करडई : ४००- ६००, पुदीना : ३००-६००, अंबाडी : ५००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-६००, चुका : ५००-१०००, चवळई : ५००-६००, पालक : ८००-१४००.

Pune Market Committee
Ajit Pawar असतील Milk FRP Committee च्या अध्यक्षपदी | Milk FRP | Agrowon

फुलबाजार

तुळशीच्या लग्नामुळे विविध फुलांच्या आवकेत आणि मागणीत वाढ झाल्याने दर स्थिर होते.फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ४०-६०, अॅस्टर : ४ जुड्या ः १०-२०, सुटा ८०-१२०, कापरी : २०-४०, शेवंती : २०-५०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-४०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ६०-२००, जरबेरा : ३०-५०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी १००-२००, लिलीयम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ६०-१००, चमेली : ३००-४०० .

फळबाजार

फळबाजारात रविवारी (ता.६) लिंबाची सुमारे ३ हजार गोणी आवक झाली होती. मात्र आवकेत हिरव्या लिंबाचे प्रमाण जास्त होते. तर लोणचे उद्योगाकडून पिवळ्या लिंबांना मागणी असल्याने हिरव्या लिंबाची मागणी घटली होती. इतर आवकेमध्ये डाळिंब ३० टन, पपई ५ टेम्पो, चिकू १ हजार गोणी आणि बॉक्स, मोसंबी ६० टन, संत्रा २५ टन, पेरू सुमारे ९०० क्रेट, कलिंगड ४, तर खरबूज २ पिकअप, सीताफळ ५० टन आवक झाली होती. तर बोरांचा हंगाम सुरू झाला असून, सोलापूर जिल्ह्यांमधून विविध बोरांची सुमारे ७० गोणी आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे

लिंबे (गोणीस) - २५०-४००, डाळिंब (किलो) गणेश - १०-४०, भगवा ६०-२००, आरक्ता २०-८०, पपई प्रति किलो -८-२०, पेरू (२० किलो) -२५०-४००, सीताफळ - २०-९०, कलिंगड ८-२८ खरबूज २०-३५, मोसंबी ३ डझन २५०-४००, ४ डझन १२०-२००. संत्रा (१० किलो) २००-६००. बोरांची प्रति १० किलोचे दर चण्यामण्या - ५००-८००, चेकनट १०००-१२००, चमेली ३५०-४००, उमराण १७० ते २००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com