Nagar APMC
Nagar APMCAgrowon

Vegetable Rate : नगरला भाजीपाल्याची आवक काहीसी वाढली

दरात सुधारणा कायम : डाळिंब दरात सुधारणा कायम

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dada Shalke APMC) मागील पंधरवड्याच्या तुलनेमध्ये मागील आठवड्यात भाजीपाल्याची आवक (Vegetables Rate) काहीशी वाढली. भाजीपाल्यासह फळांच्या दरात सुधारणा कायम आहे.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली होती. आता मात्र पाऊस थांबला असल्यामुळे भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली आहे. दररोज १००० ते ११०० क्विंटल भाजीपाल्याची आवक होत असून त्यात टोमॅटोची दर दिवसाला १६५ क्विंटलची आवक होऊन ७०० ते तीन हजार रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

Nagar APMC
Shirur APMC : पाबळ उपबाजारात वर्षभरात २२.५० कोटींची उलाढाल

वांगीची १६ क्विंटलपर्यंत आवक होऊन २००० ते ६ हजार रुपये, फ्लॉवरची ३३ क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच हजार ते चार हजार रुपये, कोबीची ७० क्विंटलपर्यंत आवक होऊन ७०० ते अडीच हजार रुपये, काकडीची ३३ क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते अडीच हजार रुपये, घोसाळ्याची दहा क्विंटलपर्यंत आवक होऊन २००० ते अडीच हजार, गवारची १२ क्विंटलपर्यंत आवक होऊन पाच हजार ते दहा हजार रुपये, दोडक्याची २२ क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच हजार ते चार हजार रुपये,

कारल्याची २६ क्विंटलपर्यंत आवक होऊन दीड हजार ते साडेचार हजार रुपये, भेंडीची २७ क्विंटल आवक होऊन ९०० ते साडेतीन हजार रुपये, वाल शेंगाची पाच क्विंटलपर्यंत आवक होऊन साडेपाच हजार ते ७००० रुपये, घेवड्याची बारा क्विंटलचे आवक होऊन तीन हजार ते सहा हजार रुपये, बटाट्याची सव्वातीनशे क्विंटलपर्यंत आवक होऊन २१०० ते २३५० रुपये, हिरव्या मिरचीची ९४ क्विंटल पर्यंत आवक होऊन अडीच हजार ते ५ हजार रुपये, शेवग्याची सहा क्विंटलपर्यंत आवक होऊन आठ हजार ते दहा हजार रुपये, शिमला मिरचीची २७ क्विंटलची आवक होऊन २००० ते ५००० रुपयांपर्यंतचा प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. भाजीपाल्यात शेपू, मेथी, पालक, चुका, आदी भाज्यांना चांगली मागणी राहिली असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

सीताफळ २००० ते साडेचार हजार

नगर येथील बाजार समितीचे फळाची दर दिवसाला ६० ते ८० क्विंटल पर्यंत आवक होत आहे. सीताफळाला प्रतिक्विंटल २००० ते साडेचार हजार रुपयांचा दर मिळत आहे. मोसंबीची दररोज ६० क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते साडेचार हजार डाळिंबाची ३० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते १५ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. संत्र्यांची ९० क्विंटल पर्यंत आवक होऊन पाचशे ते साडेचार हजार रुपये पर्यंत तर पपईची २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन पाचशे ते बाराशे रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com