Chana Rate : खानदेशात हरभरा दर स्थिर

कोरडवाहू क्षेत्रात एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन आले आहे. तर बागायती किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रातून एकरी सात ते नऊ क्विंटलचे उत्पादन येत आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

Jalgaon Chana Rate : खानदेशातील बाजारात हरभऱ्याची आवक (Chana Arrival) बऱ्यापैकी होत आहे. दर स्थिर आहेत. काबुली हरभऱ्यास आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर (Chana Market Rate) मिळत आहे.

लहान काबुली (Kabuli Chana) व मोठ्या काबुली प्रकारच्या हरभऱ्याचे दर देशी व इतर हरभऱ्याच्या तुलनेत कमी आहेत. सध्या देशी, संकरित हरभऱ्याचे दर ४४०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

काबुलीमध्ये लहान काबुली हरभऱ्यास साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल तर मोठ्या काबुलीस आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. दरवाढ मात्र कमी आहे. काबुली हरभऱ्यास चांगला उठाव आहे.

मध्य प्रदेश, गुजरातमधील खरेदीदार धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा येथील एजंट, लहान व्यापाऱ्यांकडे त्याची मागणी नोंदवीत आहेत. काबुली हरभऱ्याची खरेदी थेट गावांमधून किंवा शिवार खरेदी काही खरेदीदार करून घेत आहेत. कारण त्याचा तुटवडा आहे.

Chana Rate
Chana Procurement : ‘नाफेड’मार्फत हरभऱ्याच्या खरेदीसाठी सोमवारपासून नोंदणी

खानदेशात यंदा सुमारे दोन लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी (Chana Sowing) झाली होती. पाऊसमान चांगले राहिल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पेरणीदेखील अपेक्षेप्रमाणे झाली होती.

ही पेरणी यंदा काही भागात अधिक होती. काळ्या कसदार जमिनीत तापी, पांझरा, अनेर, गिरणा व इतर नद्यांच्या क्षेत्रात कोरडवाहू हरभरा पीक अधिक होते.

उत्पादनही बऱ्यापैकी आले आहे. कोरडवाहू क्षेत्रात एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन आले आहे. तर बागायती किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रातून एकरी सात ते नऊ क्विंटलचे उत्पादन येत आहे. परंतु देशी किंवा संकरित, सुधारित हरभऱ्याचे दर स्थिर आहेत. दरवाढीची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Chana Rate
Chana Procurement : नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची मागणी

या बाजारात आवक चांगली...

सध्या खानदेशातील अमळनेर (जि.जळगाव), दोंडाईचा (ता.शिंदखेडा, जि.धुळे), चोपडा (जि.जळगाव), नंदुरबार व शहादा (जि.नंदुरबार) येथील बाजारात हरभऱ्याची चांगली आवक होत आहे.

देशी हरभऱ्याची सध्या जळगाव जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांत मिळून रोज किंवा प्रतिदिन सरासरी अडीच हजार क्विंटल आवक होत आहे. ही आवक पुढील आठवड्यात वाढेल. कारण हरभऱ्याची मळणी सर्वत्र पूर्ण होत आली आहे.

काही शेतकऱ्यांची मळणी मार्चच्या अखेरीस सुरू होईल. परंतु आगाप, वेळेत पेरणी केलेल्या हरभऱ्याची मळणी जवळपास पूर्ण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com