
नवनाथ इधाटे
Cotton Market Phulambri : सातत्याने होणाऱ्या कापसाच्या (Cotton Rate) घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता आता वाढल्या असून फुलंब्रीच्या आठवडी बाजारात चक्क साडेसहा हजार रुपयांनी कापसाचे खरेदी (Cotton Procurement) व्यापारी करताना दिसून आले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
विशेष म्हणजे भाव वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस (Cotton Storage) घरातच ठेवला होता. मात्र, भाव वाढ न होत दिवसेंदिवस भाव कमी होत असल्याने नाइलाजाने बळिराजाला कापूस विकावा लागत आहे.
सुरुवातीला कापसाने नऊ हजाराचा पल्ला पार केला होता. आता मात्र, दररोज कापसाच्या दरात घसरण सुरू असल्याने केवळ साडेसहा हजारांवरच शेतकऱ्याची बोळवण व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे चित्र बाजारात आहे.
शासनाने कापसाला स्थिर हमीभाव उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. फुलंब्री तालुक्यात यावर्षी सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.
परंतु चार महिन्यापासून कापसाचे प्रमाण वाढत असले तरी त्याचे भाव मात्र स्थिर नसल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
सुरुवातीला कापसाची सुमारे नऊ हजार रुपयांनी व्यापाऱ्यांनी खरेदी केली. नंतर आणखी भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला होता;
मात्र, दिवसेंदिवस कापसाची घसरून सुरूच असून केवळ सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांनी फुलंब्रीच्या आठवडी बाजारात व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी केली आहे.
आता कापसाचे भाव स्थिर नसल्याने कापूस विकावा की घरात ठेवावा या चिंतेने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
शेतकरी वर्गात नाराजी
दिवाळीच्या अगोदर खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली होती. सुरूवातीला कापसाचे भाव नऊ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे आणखी भाव वाढतील म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला आहे. परंतु, सध्या दिवसेंदिवस कापसाच्या भावात घसरण होत चालली असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.