Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर वाढले !

देशातील बाजारात कापसाची दरपातळी आज ८ हजार ३०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये यादरम्यान दर मिळाला. हा दर मागील तीन दिवसांपासून कायम आहे.
Cotton Price
Cotton Price Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (International Cotton Market) चढ उतार सुरु झाले. काल दरात मोठी घट झाल्यानंतर आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर टिकून राहण्यास पोषक स्थिती आहे. देशातही काही बाजारांंमध्ये कापसानं वाढ नोंदवली.

आज देशातील बाजारात कापसाचा कमाल दर कायम होता. मागील पाच दिवसांपासून कापसाचा कमाल दर ८ हजार ९०० रुपयांवर कायम आहे. आज एक-दोन ठिकाणी ८ हजार ९५० रुपये दर मिळाला. मात्र हा दर जास्त बाजारात मिळाला नाही. तसंच आज किमान दर अनेक बाजारात सुधारणा पाहायला मिळाली. तर काही बाजारात कमाल दरही वाढले. पण सरासरी दरपातळी कायम होती. जास्तीत जास्त शेतकऱ्याला मिळालेला दर सरासरी असतो.

देशातील बाजारात कापसाची दरपातळी आज ८ हजार ३०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये यादरम्यान दर मिळाला. हा दर मागील तीन दिवसांपासून कायम आहे. पण आजही अनेक बाजारांमधील किमान दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत मिळतोय. मात्र सरासरी दर साडेआठ हजारांच्या दरम्यान आहे.

राज्याचा विचार करता, आज कापसाची आवक काहीशी कमी झाली होती. तर राज्यातील सरासरी दरपातळी ८ हजार ३०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचली. राज्यातील काही बाजारांमध्ये आजही कापसाला कमाल दर ८ हजार ९०० रुपये मिळाला. तर किमान दर ८ हजार रुपयांपर्यंत पोचला होता.

एकूणच काय दर सध्या देशात कापसाला  ८ हजार ३०० ते ८ हजार ९०० रुपये दर मिळतोय. तर राज्यातील सरासरी दरपातळी ८ हजार ३०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे.

Cotton Price
Smart Cotton Project : स्मार्ट कॉटन प्रकल्पातून कापूस प्रक्रियेला सुरुवात

आता आंतरराष्ट्रीय बाजाराकडं वळूयात… आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापूस दर शेवटच्या टप्प्यात घसरले होते. दर ८५.७५ सेंट प्रतिपाऊंडवरून ८३.११ सेंटपर्यंत कमी झाले होते. रुपयात सांगायचं झालं तर कापसाचा भाव १५ हजार ६५७ रुपये प्रतिक्विंटलवरून १५ हजार १७५ रुपयांपर्यंत कमी झाला. म्हणजेच काल कापूस दर क्विंटलमागं ४८२ रुपयानं कमी झाले होते.

मात्र आज कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज कापसाचे दर सायंकाळपर्यंत ८४ सेंटवर पोचले होते. रुपयात सांगायचं झालं तर कापूस दर १५ हजार ३३८ रुपये क्विंटल झाले. कापसाचे दर आज वाढले आणि पुढील काळात दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

सध्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फंडामेंटल्स म्हणजेच मुलभूत घटक बघता कापूस दर ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात. तसंच फंडामेंटल्स बदलले की दरावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळं फंडामेंटल्सकडं लक्ष असणं गरजेचं आहे. तसंच शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी बाजारातील सरासरी दराचा आढावा घ्यावा. यामुळं बाजारातील भावपातळीचा अचूक अंदाज बांधता येईल. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com