Grape Export : संपामुळे द्राक्ष निर्यातीसाठी ४ बी फॉर्म मिळण्यात अडचणी

द्राक्ष उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झाले आहेत. त्यातच निर्यातक्षम गुणवत्तेचा माल तयार असताना व्यापारी व निर्यातदार यांनी खुडे थांबवले आहेत.
Grape Export
Grape ExportAgrowon

Grape Market News नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) हवालदिल झाले आहेत. त्यातच निर्यातक्षम (Exportable Grape) गुणवत्तेचा माल तयार असताना व्यापारी व निर्यातदार यांनी खुडे थांबवले आहेत.

मात्र नुकसान टाळण्यासाठी खुडे (Grape Harvesting) वेळेवर होण्याची शेतकरी घाई करत आहेत. अशातच जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर राज्यांतील शासकीय कर्मचारी संपावर आहेत.

या पार्श्‍वभूमीवर काही ठिकाणी क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेली कृषी विभागाची (Agriculture Department) यंत्रणा काहीशी बाजूला गेल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

निफाड तालुक्यात द्राक्ष निर्यातीसाठी आवश्यक असणारे शेतकऱ्यांचे ४ बी फॉर्म मिळण्यात अडचणी असल्याने ते देण्यात यावे, अशी सूचना माजी आमदार अनिल कदम यांनी तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्याकडे केली आहे. त्यानुसार गागरे यांनी तातडीने पत्र काढून कृषी सहायकांना ४ बी फॉर्म देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Grape Export
Grape Export : सांगलीतून ९ हजार टन द्राक्षे सातासमुद्रापार

ग्रेपनेट प्रणालीत द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केल्यानंतर निर्यात प्रक्रियेत ४ बी फॉर्मची आवश्यकता असते. एकीकडे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल आहे.

त्यात अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष बागा निर्यातीसाठी तयार आहेत. मात्र कृषी सहायक कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे ४बी फॉर्म उपलब्ध होत नव्हते.

Grape Export
Grape Orchard : संभाव्य पावसाळी स्थितीमध्ये द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना

निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या बाबत माजी आमदार अनिल कदम यांच्याकडे या बाबत तक्रार केली होती. त्यांनी तत्काळ तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांना ४ बी फॉर्म शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार गागरे यांनी संपकाळातही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ४ बी फॉर्म उपलब्ध करून देण्याचे लेखी परिपत्रक कृषी सहायक यांना काढले आहे.

४ बी फॉर्म उपलब्ध करून देण्याच्या सूचना

१४ मार्चपासून कृषी सहायक राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. त्यातच द्राक्ष हंगाम सुरू असल्याने द्राक्ष निर्यात करण्यासाठी ४ बीचे फॉर्म उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे १५ मार्चपासून आंदोलन संपेपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून शेतकऱ्यांना ४ बी फॉर्म उपलब्ध करून द्या, अशा सूचना परिपत्रक काढून तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी कृषी सहायकांना दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com