Soymeal Export : देशातून सोयापेंड निर्यात वाढली

देशात दोन दिवसांपासून सोयाबीन दराने काहीशी उचल घेतली. अनेक बाजारांत दर सुधारले आहेत.
Soymeal Export
Soymeal ExportAgrowon

Soybean Market Update पुणे ः देशात दोन दिवसांपासून सोयाबीन दराने (Soybean Rate) काहीशी उचल घेतली. अनेक बाजारांत दर सुधारले आहेत. बुधवारी (ता. ८) सोयाबीनची दरपातळी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होती.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) देशातील सोयापेंड (Soymeal Rate) वापर आणि निर्यात (Soymeal Export) वाढल्याचे स्पष्ट केले. यामुळे सोयाबीन दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोपाने आपल्या अहवालात म्हटले आहे, की देशातील सोयाबीन हंगाम सुरू होऊन चार महिने पूर्ण झाले. ऑक्टोबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांनी ६१ लाख टन सोयाबीन विकले.

तर जळपास ८७ लाख टन सोयाबीन शेतकरी, व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांच्याकडे असल्याचे ‘सोपा’ने म्हटलेय. गेल्या हंगामात याच काळात शेतकऱ्यांनी केवळ ४८ लाख टन सोयाबीनची विक्री केली होती. म्हणजेच बाजारातील आवक जवळपास ३० टक्क्यांनी जास्त राहिली.

Soymeal Export
Soybean Market : खाद्यतेल आयातशुल्क वाढवा, सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान द्या; `सोपा`ची मागणी

बाजारात आलेल्या सोयाबीनपैकी ४३ लाख ५० हजार टनांचे गाळप झाले. मागील हंगामात याच काळातील गाळप २८ लाख ५० हजार टन होते, असेही ‘सोपा’ने म्हटलेय.

यंदा सोयाबीन गाळप वाढल्याने सोयापेंड निर्मितीही वाढली. चालू हंगामात पहिल्या चार महिन्यांत ३४ लाख ९४ हजार टन सोयापेंड निर्मिती झाली. तर मागील हंगामात याच काळात २२ लाख ७५ हजार टन सोयापेंड मिळाली होती, असेही ‘सोपा’ने सांगितले.

Soymeal Export
Soybean Market : सोयाबीन दरात सुधारणा; किती झाली वाढ?

देशातील सोयापेंड वापरही वाढला

देशातील सोयापेंडचा वापरही वाढल्याचे ‘सोपा’ने सांगितले. यंदा पहिल्या चार महिन्यांमध्ये देशात २८ लाख टन सोयापेंडचा वापर झाला. मागील हंगामातील याच काळात देशांतर्गत सोयापेंडचा वापर २४ लाख २० हजार टनांवर होता. म्हणजेच यंदा ३ लाख ७० हजार टनांनी देशातील सोयापेंड वापर वाढला.

अडीच लाख टन निर्यात वाढली

यंदा देशातून सोयापेंड निर्यातही वाढल्याचे ‘सोपा’ने स्पष्ट केले. ‘सोपा’च्या मते ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत देशातून ६ लाख ३१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. तर मागील हंगामात याच काळातील निर्यात ३ लाख ८३ हजार टनांवर होती. म्हणजेच यंदा सोयापेंड निर्यात जवळपास अडीच लाख टनांनी अर्थात तब्बल ६५ टक्क्यांनी अधिक आहे.

Soymeal Export
Soybean Export : नोव्हेंबरमधील ब्राझीलची सोयाबीन निर्यात घटली

निर्यातवाढीचा दराला आधार

देशातून सोयापेंड निर्यात वाढल्याचेही ‘सोपा’ने स्पष्ट केले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय सोयापेंडलाही मागणी वाढली. निर्यात वाढल्याने देशातील बाजारात सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळत आहे.

दरवाढ कायम राहील

सोयाबीनच्या दरात मागील तीन दिवसांत ३०० ते ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. बुधवारी (ता. ८) देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. देशातून सोयापेंड निर्यातीचा वेग कायम राहण्याचा अंदाज आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दर टिकून आहेत. त्यामुळे देशातील दरवाढ कायम रहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com