Cotton Rate : कापूस, कांद्याच्या आवकेत वाढ

खरीप पिकांची आवक सुरु होऊन आता जवळ जवळ दोन महिने झाले. सोयाबीनची आवक डिसेंबर महिन्यात अधिक किमतीच्या अपेक्षेने साप्ताहिक पाच लाख टनांवरून दोन लाख टनावर घसरली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

खरीप पिकांची आवक (Kharif Crop Arrival) सुरु होऊन आता जवळ जवळ दोन महिने झाले. सोयाबीनची आवक (Soybean Arrival) डिसेंबर महिन्यात अधिक किमतीच्या अपेक्षेने साप्ताहिक पाच लाख टनांवरून दोन लाख टनावर घसरली. कांद्याची आवक (Onion Arrival) सध्या वाढीव पातळीवर साप्ताहिक साडेतीन लाख टन, तर टोमॅटोची ८० लाख टन आहे. कापसाचीही आवक (Cotton Arrival) आता वाढू लागली आहे.

Cotton Rate
Onion Disease : ओळखा कांदा पिकावरील करपा रोगाची लक्षणे

गेल्या महिन्यात कापूस, हळद, तूर व कांदा यांच्या किमती उतरत होत्या. मक्याची मागणी वाढती आहे; त्यामुळे आवकेत वाढ झाली, तरी किमतीसुद्धा गेल्या महिन्यात वाढत होत्या. कापूस व सोयाबीनच्या किमतीसुद्धा नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. कांद्याच्या आवकेचा परिणाम मात्र कांद्याच्या किमती घसरण्यावर झाला.

Cotton Rate
Cotton Market : कापूस दरात चैतन्य कधी येणार?

पिंपळगावमध्ये या महिन्यात कांद्याच्या किमती रु. २६५० वरून रु. १,१४० वर आल्या. या पूर्वी २०११, २०१६ व २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती रु. १००० पेक्षा कमी झाल्या होत्या. वाढत्या आवकेचा परिणाम टोमॅटोच्यासुद्धा किमती घसरण्यावर झाला. या सप्ताहात जुन्नर (नारायणगाव) येथे टोमॅटोचे भाव रु. ४६० वर आले आहेत.

या वर्षी (२०२३) हळदीचे NCDEX मधील व्यवहार फक्त एप्रिल, मे, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर या सहा डिलिव्हरी महिन्यांसाठी होतील. २०२२ मध्ये ते नऊ महिन्यांसाठी होते.

या सप्ताहामधील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालीलप्रमाणे आहेत.

Cotton Rate
Cotton Rate : अपेक्षित दराअभावी कापसाच्या आवकेत घट

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) नोव्हेंबर महिन्यात वाढत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.२ टक्क्यांनी घसरून रु. ३२,८९० वर आले होते; या सप्ताहात ते २.९ टक्क्यांनी घसरून रु. ३१,९४० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) ३.५ टक्क्यांनी घसरून रु १,६९५ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्याने वाढून रु. २,२२५ वर आले आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२४२ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२६५ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत. या वर्षी खरीप मक्याचे देशातील उत्पादन उच्चांकी (२३.१ दशलक्ष टन) राहील असा शासनाचा अंदाज आहे. (गेल्या वर्षी ते २२.६३ दशलक्ष टन होते). मागणीसुद्धा वाढती राहील.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ७,३७७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ७,२३० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,८९२ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ७,८९२ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून रु. ५,००६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. ४,९६७ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

मूग

मुगाच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,१२५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. सध्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) रु. ५,४८४ वर आली होती; या सप्ताहात ती ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ५,६७२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात १.९ टक्क्यांनी घसरून रु. ६,८३२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. कांद्याची किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,३३० होती; या सप्ताहात ती रु. १,१४० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४९२ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ४६० वर आली आहे.

(सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो)

: arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com