Wheat Market : सरकार यंदा गव्हाची खरेदी वाढविण्याचा अंदाज

गेल्या हंगामात खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत होते. त्यामुळं सरकारला उद्दीष्टापेक्षा कमी गहू खरेदी करता आला. तसंच खुल्या बाजारातील गहू दरवाढ आजही कायम आहे. सध्या गव्हाचे दर विक्रमी पातळीवर पोचले. पण यंदा सरकार गहू खरेदी वाढवण्याची शक्यता आहे.
Wheat Market
Wheat MarketAgrowon

गेल्या हंगामात खुल्या बाजारात गव्हाचे दर (Wheat Rate) तेजीत होते. त्यामुळं सरकारला उद्दीष्टापेक्षा कमी गहू खरेदी करता आला.

तसंच खुल्या बाजारातील गहू दरवाढ आजही कायम आहे. सध्या गव्हाचे दर विक्रमी पातळीवर पोचले. पण यंदा सरकार गहू खरेदी वाढवण्याची शक्यता आहे.

मग गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त असताना सरकारला गहू मिळेल का? सरकार गव्हाला बोनस देईल का? गव्हाचे दर यंदा काय राहू शकतात? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Wheat Market
Wheat Market: सरकार खुल्या बाजारात गहू विकण्याची शक्यता

1. देशात कापूस दर कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार सुरुच आहेत. काल ८७ सेंटपर्यंत वायदे पोचले होते.

मात्र देशात कापूस दर कायम त्यानंतर दरात पुन्हा घसरण होत गेली. मात्र बाजार ८५.७६ सेंटवर बंद झाला होता.

आज दुपारपर्यंतही दरात चढ उतार होत गेले. दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८५.३२ सेंटवर होते. तर देशातील बाजारात कापूस दर अद्यापही ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

बाजारात आवक वाढल्याचाही परिणाम कापूस दरावर होत असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

Wheat Market
Soybean Market: चीन यंदा सोयाबीन आयात वाढविण्याचा अंदाज | Agrowon

2. सोयाबीन दरात चढ उतार

देशातील बाजारात सोयाबीनचे दर आजही स्थिर आहेत. सोयाबीनला आज सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडचे दर नरमले आहेत. सोयाबीनचे वायदे १४.८५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडने ४६० डाॅलरचा टप्पा गाठला होता.

देशात सध्या सोयाबीनचे दर दबावात आहेत. खाद्यतेल बाजाराचा दबावही सोयाबीन दरावर येतोय. पण पुढील काळात सोयाबीनचे दर वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

3. हिरव्या मिरचीचे दर तेजीत

हिरव्या मिरचीचे दर सध्या तेजीत आहेत. राज्यातील जवळपास सर्वच बाजारांमधील हिरव्या मिरचीची आवक कमी झाली.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर हे बाजार वगळता इतर ठिकाणी दैनंदीन आवक २० क्विंटलपेक्षा कमी दिसते.

त्यामुळं सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

हिरव्या मिरचीचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

4. लिंबाचे बाजारभाव दबावात

बाजारात सध्या लिंबाला सरासरीपेक्षा कमी दर मिळतोय. सध्या बाजारातील आवक कमी असली तरी थंडीमुळं उठाव कमी मिळतोय.

त्याचा परिणाम दरावर जाणवतोय. सध्या राज्यातील बाजारात लिंबाला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

मात्र थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर पुढील काळात लिंबाचे दर वाढू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

5. देशात सध्या गव्हाचे भाव तेजीत आहेत. देशातील बाजारात सध्या गव्हाला सरासरी २ हजार ९०० ते ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. केंद्रानं चालू हंगामासाठी २ हजार १२५ रुपये हमीभाव जाहीर केला.

सध्या गव्हाचे भाव हमीभावापेक्षा ५० टक्क्यांनी अधिक आहेत. तसंच गव्हाचे भाव पुढील काळातही तेजीत राहण्याचा अंदाज आहे.

देशातील नवा गहू दोन महिन्यांनंतर बाजारात येईल. पण नवा गहू बाजारात आल्यानंतरही दर हमीभावापर्यंत कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

त्यामुळं सरकारला यंदा गहू खरेदी करायचा असल्यास हमीभावावर मोठा बोनस द्यावा लागेल. सध्या भारतीय अन्न महामंडळाकडे गव्हाचा १७ लाख टन साठा आहे.

हा साठा मागील अनेक वर्षांतील निच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळं सरकारला यंदा गव्हाची खरेदी करणं गरजेचं आहे. मागील हंगामात उद्दीष्टापेक्षा ५६ टक्के कमी खरेदी झाली.

खुल्या बाजारात दर जास्त होते. त्यामुळं सरकारची खरेदी कमी झाली. सरकारला आता खुल्या बाजारात गहू विकता येत नाही. मात्र पुढील वर्षी काही राज्यांच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. बाजारात गव्हाचे भाव जास्त राहणं सरकारला परवडणारं नाही.

त्यामुळं यंदा सरकार जास्त गहू खरेदीचा प्रयत्न करेल. वेळप्रसंगी बोनसही देऊ शकते. त्यामुळं यंदा खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com