Agrowon Podcast : मक्याचे भाव कधीपर्यंत दबावात राहतील?

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढत आहे. त्यातच अनेक भागात पावसाचीही हजेरी दिसत आहे.
Maize Rate
Maize RateAgrowon

१) आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस सुधारला (Cotton Market)

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील दोन दिवसांमध्ये कापसाच्या वायद्यांमध्ये क्विंटलमागं ३०० रुपयांची सुधारणा झाली. कापसाचे वायदे ८३.६२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशात मात्र कापूस बाजार स्थिर होता.

कापसाला आजही सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. देशातील बाजारात कापसाची आवक रोज एक लाख गाठींपेक्षा अधिक होत असल्यामुळं दबाव असल्याचं सांगितलं जातं. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा कायम राहिल्यास देशातही दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबीनचे भाव स्थिर (Soybean Rate)

देशातील बाजारात सोयाबीनचे भाव आजही स्थिर दिसले. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दीड लाख क्विंटलच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही वायदे स्थिर आहेत.

सोयाबीनचे वायदे १४.२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४२५ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड दबावात असल्याचा परिणाम देशातील बाजारातवरही झाला.

त्यामुळं पुढील काही दिवस सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) तुरीच्या दरातील तेजी कायम (Tur Rate)

देशातील बाजारात तुरीचे भाव आजही टिकून होते. तुरीला सरासरी ८ हजार ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील आवक मर्यादीत असल्यानं दरातील तेजी टिकून आहे.

पण दुसरीकडं सरकार तुरीचे भाव कमी करण्यासाठी व्यापारी आणि स्टाॅकिस्टना माल बाजारात आणण्याचा दबाव वाढवत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात अपेक्षित तेजी दिसली नाही. पण पुढील काळात तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Maize Rate
Chana Procurement : तीन जिल्ह्यांत ३७ केंद्रांवरून आधारभूत किमतीने हरभरा खरेदी

४) नाफेडची हरभरा खरेदी जोमात (Chana Procurement)

देशात नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेडने आतापर्यंत १६ लाख ६४ हजार टनांची खरेदी केली. सर्वाधिक खरेदी महाराष्ट्रात होतेय. नाफेडची खरेदी वाढल्यानंतरही खुल्या बाजारात मात्र हरभऱ्याचे भाव दबावात आहेत.

बाजारात हरभऱ्याला सध्या ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नाफेडची खरेदीमुळं दर टिकून असल्याचं सांगितलं जातं. नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर हरभरा बाजारावर काही काळ दबाव दिसू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) मक्याचे भाव सुधारतील का? (Maize Rate)

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढत आहे. त्यातच अनेक भागात पावसाचीही हजेरी दिसत आहे. सध्या महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील बाजारात आवक वाढतेय.

महात्वाच्या बाजारांमध्ये आवकेचा दबाव दिसून येत आहे. महत्वाच्या बाजारांमध्ये रोज १०० ते ५०० टनांच्या दरम्यान आवक होतेय. ही आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मक्याची आवक वाढल्याचा दबाव दरांवरही आला.

Maize Rate
Chana, Soybean Market : मका, हळद, हरभरा, सोयाबीनमध्ये उतरता कल

मक्याचे भाव सध्या दबावात दिसतात. महाराष्ट्रात मक्याला १ हजार ६०० ते २ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. अनेक राज्यांमध्ये किमान भाव १ हजार ६०० रुपयांच्या जवळपास आहे. कारण काढणी केल्यानंतर पावसाच्या भीतीने शेतकरी मका वाळवण्याऐवजी थेट बाजारात नेत आहेत.

या मालात ओलावा अधिक असतो. त्यामुळं किमान भाव कमी दिसतात. मध्य प्रदेश आणि तेलंगणात मका सरासरी १ हजार ६०० ते २ हजाराने विकला जातोय. तर उत्तर प्रदेशातील दरपातळी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दिसते.

खरिपाच्या तोंडावर मक्याची आवक अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पण त्यानंतर मक्याची आवक मर्यादीत होण्याचा अंदाज आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज मका बाजारातील व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com