Chana Market : नव्या हरभऱ्याची बाजारातील आवक वाढतेय

देशातील बाजारात आता नवा हरभरा दाखल होत आहे. मात्र दुसरीकडे नाफेडची हरभरा विक्री सुरुच आहे. त्याचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे. पण दुसरीकडे यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Chana Market
Chana Market Agrowon

1. सोयाबीन बाजार स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean Market) आणि सोयापेंडच्या (Soyameal) दरात चढ उतार सुरुच आहेत. मात्र आज सुरुवातीपासून वाढ झाली.

दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४८९ डाॅलर प्रतिटनांपर्यंत होते.

देशातील बाजारातही सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) काहीशी वाढ झाली होती. बहुतेक बाजारांमधील सरासरी दर ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होता.

तर सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनच्या दरात पुढील काळात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

2. कापूस दरात नरमाई कायम

देशातील बाजारात कापसाच्या दरात आजही नरमाई दिसून आली. अनेक बाजारांमध्ये कमाल दरात आज क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत नरमाई आली होती.

तर देशातील सरासरी भावपातळी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होती. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र दर कायम आहेत. काॅटलूक ए इंडेक्स १००.७० सेंट प्रतिपाऊंडवर होता. तर वायद्यांमधील दरात चढ उतार सुरुच आहेत.

सध्या कापसाचे दर दबावात असले तरी सध्याच्या दरात कापसाला चांगला उठाव आहे. तसेच निर्यातही वाढली. त्यामुळं दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Chana Market
Chana Market : नव्या हरभऱ्याची बाजारात एन्ट्री

3. हिरव्या मिरचीचे दर तेजीत

राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक घटली आहे. मोठ्या बाजार समित्यांमधील आवक जास्त दिसत असली तरी इतर बाजारांमधील आवक खूपच कमी आहे.

त्यामुळे हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळतोय. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय.

हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

4. मका बाजारावर आवकेचा दबाव

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढली आहे. मका उत्पादक पट्ट्यातील बाजारांमध्ये आवकेचा दबाव जास्त आहे.

सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काळात बाजारावर मका आवकेचा दबाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

या परिस्थितीत मक्याच्या भावात २०० रुपयांपर्यंत चढ उतार येऊ शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.  

देशातील बाजारात आता नवा हरभरा दाखल होत आहे. मात्र दुसरीकडे नाफेडची हरभरा विक्री सुरुच आहे. त्याचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे.

पण दुसरीकडे यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग या परिस्थितीत हरभरा बाजार कसा राहू शकतो? हरभरा दरात तेजीची शक्यता आहे का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  देशातील बाजारात आजही हरभरा दर दबावात आहेत.

नाफेडकडे मागील हंगामातील हरभऱ्याचा साठा जास्त आहे. नाफेडने हळूहळू हरभरा विक्री सरुच ठेवली. नाफेडच्या या विक्रीचा बाजारावर दबाव कायमच दिसला.

पेरणीच्या ताज्या आकड्यांनुसार देशात ११२ लाख हेक्टरवर लागवड झाली. सरकारच्या आकड्यांनुसार जवळपास २ टक्क्यांनी लागवड कमी आहे.

मात्र उद्योग आणि व्यापारी सुत्रांच्या मते लागवड यापेक्षा जास्त प्रमाणात घटली. बाजारातील आवकेचा विचार करता आत्तापर्यंत ७९ हजार क्विंटल नवा हरभरा बाजारात आला होता.

कर्नाटकात सर्वाधिक आवक झाली. कर्नाटकातील बाजारात ४२ हजार क्विंटल हरभरा आला होता. तर महाराष्ट्रातील बाजारात ३० हजार क्विंटल हरभऱ्याची शेतकऱ्यांनी विक्री केली. गुजरातमध्येही ७ हजार क्विंटल हरभरा बाजारात आला.

बाजारातली हरभरा आवक पुढील काळात वाढेल. यंदा लागवड कमी झाली आणि उत्पादनात घट येण्याचा अंदाज असला तरी दरात फार मोठ्या तेजीची सध्यातरी शक्यता नसल्याचं सांगितलं जातंय.

सध्या हरभऱ्याला सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा हरभरा दर नाफडेच्या खरदीवर बऱ्यापैकी अवलंबून असतील.

नाफेडची खरेदी सुरु झाल्यानंतर खुल्या बाजारातील दरही हमीभावाच्या दरम्यान राहतील, असा अंदाज हरभरा बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com