Soybean : अर्जेंटीनामध्ये सोयाबीन पेरणी धोक्यात

अर्जेंटीनाने गेल्या हंगामातील ७५ टक्के सोयाबीनची विक्री केली आहे. तर यंदा अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे येथील सोयाबीन पेरणीचा वेग गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे.
 Soybean
Soybean Agrowon

अर्जेंटीनाने गेल्या हंगामातील ७५ टक्के सोयाबीनची (Soybean) विक्री केली आहे. तर यंदा अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे येथील सोयाबीन पेरणीचा वेग गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे अर्जेंटीनातील सोयाीबन पेरणी यंदा घटण्याची शक्यता आहे. मग याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर काय परिणाम होईल? देशातील सोयाबीनला याचा आधार मिळेल का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

 Soybean
Kharif Sowing : धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात

1. सोयाबीन बाजार स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर सुधारत आहेत. मात्र देशातील बाजारात सोयाबीन दर स्थिर आहेत. आजही देशात सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनचे दर दबावात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री कमी केली आहे. सध्या देशात सरासरी अडीच लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होत आहे. सध्या सोयाबीन बाजार स्थिर असला तरी पुढील काळात सोयाबीन दर सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

 Soybean
Soybean : देशात सोयाबीन पेरणी घटली?

2. कापूस काहीसा नरमला

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्राकडे कापूस आयातीवरील शुल्क रदद् करण्याची मागणी केली. त्याचा काहीसा मानसिक परिणाम बाजारावर जाणवला. काही बाजारांमध्ये आज कापूस दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. मात्र सरकार उद्योगाची ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. तसेच सरकारने आयातशुल्क कमी केले तरी निर्यातदार देश दर वाढवतील. त्यामुळे कापूस दरावर फारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. 

 Soybean
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का?

3. तुरीचे दर तेजीतच

देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र सध्या आवकेचे प्रमाण कमी आहे. त्यातही मालामध्ये ओलावा अधिक येतोय. पण देशात तुरीचा तुटवडा असल्याने प्रक्रिया उद्योगांकडून तुरीला चांगली मागणी आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या नव्या तुरीला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तुरीचे हे दर हंगामात टिकून राहतील, असा अंदाजही प्रक्रिया उद्योगाने व्यक्त केला. 

 4. वांग्याची आवक वाढली  

राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये सध्या वांग्याची आवक वाढलेली आहे. त्यामुळे वांग्याचे दर गेल्या महिन्याच्या तुलनेत काहीसे नरमले. मात्र काही बाजारांमध्ये वांग्याचे दर सरासरीच्या तुलनेत काहीसे अधिक आहेत. सध्या वांग्याला सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
 

5. जगातिक पातळीवर सोयाबीन उत्पादनात ब्राझील आणि अमरिकेनंतर अर्जेंटीना तिसऱ्या  स्थानावर आहे. यंदा भारत आणि अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाला पाऊस आणि दुष्काळाच फटका बसला. मात्र ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढून यंदा जागतिक उत्पादनही वाढेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केला होता. सध्या अर्जेंटीनात सोयाबीन पेरणी सुरु आहे. मात्र अनेक भागांना कमी पाऊस आणि उष्णतेचा फटका बसत आहे. अर्जेंटीनात आतापर्यंत सोयाबीनचा केवळ ३७ टक्के पेरा पूर्ण झाला. गेल्यावर्षीपेक्षा हा पेरा खूपच कमी आहे. अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती भीषण पातळीवर पोचली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत १६७ लाख हेक्टरवरच सोयाबीनची पेरणी झाली. कमी पावसामुळे अर्जेंटीनातील एकूण सोयाबीन लागवड कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परिणामी यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. तसेच अर्जेंटीनाने मागील हंगामातील जवळपास ७५ टक्के सोयाबीनची विक्री केली. तर यंदा उत्पादन वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे जागतिक सोयाबीन अपेक्षेपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. अर्जेंटीनातील या स्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही होत आहे. आजही सोयाबीनचे वायदे काहीसे वाढून १४.७८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्याचा सकारात्मक परिणाम देशातील बाजारावर होऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

……………..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com