Chana Market : महाराष्ट्रात हरभरा लागवड का वाढली ?

देशातील बाजारात नवा हरभरा दाखल होत आहे. सध्या हरभरा आवक कमी असली तरी मिळणारे दर हमीभावापेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे हरभरा लागवड घटली आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

देशातील बाजारात नवा हरभरा (New Chana) दाखल होत आहे. सध्या हरभरा आवक (Chana Arrival) कमी असली तरी मिळणारे दर हमीभावापेक्षा कमीच आहे.

तर दुसरीकडे हरभरा लागवड घटली आहे. मग सध्या हरभरा लागवड (Chana Sowing) किती कमी झाली? नव्या हरभऱ्याला काय दर (Chana Rate) मिळतोय? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Chana Market
Chana Market : हरभरा भाव खाणार का?

1. सोयाबीन बाजार सुस्तच

अमेरिकेच्या कृषी विभागानं यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी तेजी आली होती.

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १५.२८ डाॅलरवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असताना देशातील बाजार मात्र अद्यापही सुस्तच आहे.

देशातील सोयाबीनची दरपातळी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. 

Chana Market
Soybean Rate: देशात सोयाबीनचा बाजार सुस्तच का? Agrowon | ॲग्रोवन

2.  कापूस दरातील नरमाई कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार सुरुच आहेत. शुक्रवारी कापसाचे वायदे ८२.४५ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते.

तर देशातील बाजारातही कापसाचे दर काहीसे कमी झालेले आहेत. सध्या देशात कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ४०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे.

मात्र देशातील कापूस उत्पादन घटल्याचे अंदाज आता येत आहेत. त्यामुळं कापूस दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana Market
Cotton Soybean Rate : कापूस, सोयाबीनच्या दरांत नरमाई

3. तुरीचे दर तेजीतच

देशातील बाजारात नव्या तुरीची आवक सध्या वाढत आहे. मात्र सध्या आवकेचं प्रमाण तुलनेत कमीच दिसतंय. तसंच बाजारात येणाऱ्या तुरीला लगेच उठावही मिळतोय.

त्यामुळं सध्या तुरीला चांगला दर आहे. सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान तुरीला भाव मिळतोय. यंदा देशातील तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळं यदा तुरीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

4. गाजराला चांगला उठाव

राज्यातील बाजारात सध्या गाजराची आवक कमी आहे. सध्या राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर बाजारात सध्या आवक जास्त दिसते.

मात्र इतर बाजारात २० क्विंटलपेक्षाही कमी आहे. त्यामुळं गाजराचे दर तेजीत आहेत. सध्या गाजराला प्रतिक्विंटल १ हजार ७०० ते २ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

गाजराचे हे दर टिकून राहण्याचा अंदाज आहे. 

5. देशातील रब्बी पेरणी आता अंतिम टप्प्यात पोचली. सध्या हरभरा लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमी दिसत आहे.

गेल्या हंगामात १३ जानेवारीपर्यंत जवळपास १११ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता. मात्र यंदा १०९ लाख हेक्टरवर हरभरा पीक आहे.

आत्तापर्यंतच्या पेरणीत महाराष्ट्रात सर्वाधिक हरभरा लागवड झाल्याचं दिसतं. तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये हरभरा लागवड घटली.

महाराष्ट्रात गेल्या हंगामात या तारखेपर्यंत २५ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली होती. तर यंदा २७ लाख ६४ हजार हेक्टरवर क्षेत्र पोचलं.

मध्य प्रदेशमधील लागवड जवळपास १ लाख हेक्टरनं कमी झालं. तर गुजरातमध्येही क्षेत्र ३ लाख टनांनी घटलं. उत्तर प्रदेशात यंदा मोहरी आणि गव्हाकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे.

त्यामुळं मध्य प्रदेशसह इतर राज्यांमधील हरभरा लागवड कमी झाली. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत हरभरा लागवड गेल्यावर्षीपेक्षा जास्त केल्याचं दिसतं.

सध्या देशातील काही राज्यांमध्ये हरभरा लागवड सुरु असली तरी काही ठिकाणी मात्र नवा हरभरा बाजारात दाखल झाला. सध्या या हरभऱ्यामध्ये ओलावा जास्त आहे.

त्यामुळं मिळणार दर ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान मिळतोय. पण शेवटच्या टप्प्यात लागवड क्षेत्र किती राहतं? उत्पादन किती मिळतं? यावरून दर ठरतील.

जाणकारांच्या मते यंदा हरभरा उत्पादन कमी राहू शकतं. तर यंदा हरभऱ्याला दरही चांगला मिळू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com