Soybean Procurement : सोयाबीन खरेदी केंद्र चालविण्याचे गणित

महाराष्ट्रातील ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या ट्रेडिंग करत आहेत त्यात मुख्यतः सोयाबीन खरेदी-विक्री हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. यापैकी अनेक जण उत्पादनातून विक्रीच्या व्यवहारात (पिकविण्यापासून विक्रीत) पहिल्यांदाच आलेले तरुण आहेत. त्यांचे अनुभव ऐकल्यास यात नुकसान अधिक झाल्याचे चित्र दिसते. तर बऱ्याच मंडळींनी अद्याप फायद्या-तोट्याचे गणितच केलेले नाही. ही तर जास्तच गंभीर गोष्ट आहे. सोयाबीन ट्रेडिंग करताना खरेदी केंद्र चालविण्याचे पूर्ण गणित लक्षात घेतले पाहिजे. खरेदीचे आकारमान आणि कार्यक्षमता ही यशाची गुरुकिल्ली आहे.
Soybean Procurement
Soybean Procurement Agrowon

देशभरात सध्या १८ हजारांहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची (Farmer Producer Company) नोंदणी झाल्याचे कळते, त्याहून महत्त्वाचे म्हणजे यापैकी २५-३० टक्के शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे, ज्यापैकी काहीच प्रत्यक्षात व्यवहार करत, सक्रिय आहेत. उर्वरित जवळपास ८०-९० टक्क्यांची फक्त नोंदणी झाली आहे आणि अद्याप सक्रिय झाल्या नाहीत. ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या व्यवहारात (Soybean Procurement) सक्रिय आहेत त्यातील काही सन्माननीय अपवाद वगळता इतर सर्व मुख्यतः तीन बाबींमध्ये व्यवहार करत असल्याचे दिसते. पहिली म्हणजे खरेदी-विक्री (ट्रेडिंग), दुसरी म्हणजे निविष्ठा (कृषी सेवा) केंद्र चालवणे आणि तिसरी बाब म्हणजे बीजोत्पादन करणे.

Soybean Procurement
Soybean Seed : ‘आगामी खरिपासाठी घरचे सोयाबीन बियाणे राखून ठेवा’

महाराष्ट्रातील ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या ट्रेडिंग करत आहेत त्यात मुख्यतः सोयाबीन खरेदी-विक्री हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. यापैकी अनेक जण उत्पादनातून विक्रीच्या व्यवहारात (पिकविण्यापासून विक्रीत) पहिल्यांदाच आलेले तरुण आहेत. त्यांचे अनुभव ऐकल्यास यात नुकसान अधिक झाल्याचे चित्र दिसते. तर बऱ्याच मंडळींनी अद्याप फायद्या-तोट्याचे गणितच केलेले नाही. ही तर जास्तच गंभीर गोष्ट आहे.

Soybean Procurement
Cotton Soybean : पांढरे सोने अन् सोनेरी दाणे

सोयाबीन खरेदीतील बारकावे

सोयाबीन ट्रेडिंग करताना खरेदी केंद्र चालवण्याचे पूर्ण गणित मांडण्याचा हा प्रयत्न आहे. यातल्या बाबी सर्वांना सारख्याच लागू राहतीलच असे नाही; मात्र कमी-अधिक प्रमाणात हे गणित सर्व सोयाबीन खरेदी-विक्री करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना लागू होऊ शकेल हा विश्‍वास वाटतो. उदाहरणासाठी आपण एक नवीन शेतकरी उत्पादक कंपनी घेऊ. ही कंपनी आठवड्याला समजा २५ टन सोयाबीन खरेदी-विक्री करते व त्यास दर ५५०० रु. प्रति क्विंटल पकडू म्हणजे समजण्यास सोपे जाईल.

Soybean Procurement
Soybean Rate : सोयाबीन बाजार का स्थिर राहिला?

खरेदी केंद्रावर सोयाबीन पोहोचल्यास उतरण्याची हमाली शक्यतो शेतकरी अदा करतात. त्यामुळे अनेक वेळा तो खर्च शेतकरी उत्पादक कंपनीला करावा लागत नाही. हा खर्च सध्या साधारण २० रु. क्विंटल आहे. काही शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांचा माल पलटी पोतं घेतात; पण यात कंपनीचे नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण बंबा मारूनसुद्धा काही वेळा पोत्यातील मालाचे योग्य मूल्यमापन करता येत नाही. तेव्हा पलटी बॅग नक्कीच अधिक जोखमीची (रिस्की) ठरते. त्यात माती/काडी-कचरा किंवा बारीक/ खराब सोयाबीनचे प्रमाण मर्यादा प्रमाणापेक्षा अधिक असू शकते. परिणामी, त्याचे नुकसान कंपनीला सहन करावे लागू शकते.

जिथे खरेदी केंद्र आहे तिथे गोडाउन/ भाड्याची जागा लागेल. शासकीय गोडाउन किंवा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून सध्या साधारण १५ रु. प्रति क्विंटल प्रति महिना भाडे आकारले जाते. छोट्या कंपनीला एक गाडी भरायला सरासरी ७ दिवस लागतात. त्यानुसार सरासरी गोडाऊन भाड्यासाठी ३.५ रु. प्रति क्विंटल या प्रमाणात खर्च होतो. रिकामे पोते परत दिल्यानंतर कंपनी ढीग लावून सोयाबीन ठेवते. यात सोयाबीनचे मॉइश्‍चर कमी झाल्याने वजन घटते. यात साधारण १ टक्का वजन घट होण्याची शक्यता असते. त्यानुसार ५५०० रु. सरासरी दर पकडला, तर वजनघट ५५ रु. प्रति क्विंटल हा लॉस होतो.

Soybean Procurement
Soybean Market : आठवडाभर शेतीमाल बाजार कसा राहीला?

माल भरायला प्लॅस्टिक बॅग (पीपी) किंवा कल्थानी/सुतळी बारदाना लागेल. आपण स्वस्त पर्याय प्लॅस्टिक बॅग (पीपी) पकडला तरीही सध्या १५ रु. प्रति बॅग खर्च होतो. आणि यात सामान्यतः ६२ किलो सोयाबीन भरते. म्हणजे क्विंटलला बॅगेचा खर्च सरासरी २४.२० रु. होतो. पाला करणे, पोते भरणे, पोते गाडीत लोड करणे हे सर्व करून पोते भरायला सध्या हमाल ३० रु. प्रति क्विंटल दर घेतात.

वाहतूक खर्च आपण ६० कि.मी अंतरावर पकडला तरीही तो खर्च ६५ ते ७० रु. प्रति क्विंटल होतो. यात जर खरेदीदार कंपनीकडे गाडी त्याच दिवशी रिकामी नाही झाली तर वाहतूकदार/ ट्रान्स्पोर्टर हॉल्टिंग खर्च लावतात. २५ टनला साधारण १२०० रु. हॉल्टिंग खर्च लागतो. म्हणजे प्रति क्विंटल ४.८० रु. इतका खर्च येतो. म्हणजे सोयाबीन वाहतूक आणि डिलिव्हरी खर्च ७४.८० रु. प्रति क्विंटल होतो. यात वाहन स्वतःचे असेल, तर हा खर्च अर्धा वाचू शकतो.

प्रक्रिया केंद्रावर किंवा मोठ्या खरेदीदाराकडे जिथे कंपनी सोयाबीन विकते तिथे गाडी रिकामी करण्याची हमाली कंपनीला द्यावी लागते. ती सामान्यपणे १० रु. क्विंटल पडते. याशिवाय वारईचा खर्च साधारणपणे १२ रु. प्रति क्विंटल पडतो. वारई स्वतः कंपनी देत नसेल, तर वाहतूकदार वारई खर्च पकडून वाहतूक दर वाढवतात.

कंपनीस सोयाबीन खरेदीचे केंद्र चालवायला हमाल सोडून किमान २ जणांची टीम लागते यात १ मॅनेजर व १ अकाउंटंट लागतो. मग यांचे मासिक मानधन १५ हजार प्रत्येकी पकडले तरीही किमान ३० हजार रु. खर्च पकडावा लागतो. महिन्याला सरासरी १५० टन व्यापार पकडला तरी प्रति क्विंटल २० रु. खर्च होतो. इतर खर्च जसे की चहा-पाणी, दाभण, दोरी इ.साठी सगळे मिळून किमान १ रु. प्रति क्विंटल खर्च होतो. काही खरेदीदारांकडे तुम्ही पाठवलेल्या मालाच्या वजनात १ ते २ क्विंटल वजन घट होते. म्हणजे ५५०० ते ११००० रु. प्रति २५ टन नुकसान होते. म्हणजे ४४ रु. प्रति क्विंटल नुकसान वजन घटमध्ये सहन करावे लागते.

काही खरेदीदार मालाच्या किमतीला १ ते १.५ टक्का वटाव लावतात, म्हणजे ५५०० रु. दराला ८२.५ रु. प्रति क्विंटल वटाव लागते. काही खरेदीदार बँक चार्जेसपण शेतकरी उत्पादक कंपनीला लावतात, म्हणजे साधारण ०.१० रु. प्रति क्विंटल खर्च कंपनीला पडतो. अनेक खरेदीदार जीएसटी पेमेंट लगेचच करत नाहीत. त्यामुळे ५ टक्के रकमेला १ ते २ महिन्यांचे व्याज भरावे लागते. म्हणजे ४.५८ रु. प्रति क्विंटल जीएसटीपोटी खर्चलेल्या रकमेचे व्याज कंपनीला सहन करावे लागते.

खरेदी केंद्रावर लागणारे साहित्य म्हणजे वजनकाटा, त्याचे प्रमाणीकरण, मॉइश्‍चर मीटर, बंबा, सॅम्पलिंग मोजण्याचा काटा इत्यादींचा घसारा प्रति क्विंटल किमान ०.५० रु. पकडावा लागेल. खेळत्या भांडवलाचे व्याजदर किमान १० टक्के आहेत, त्यानुसार प्रति क्विंटल किमान १० रु. खर्च पकडणे सयुक्तिक राहील. म्हणजे सोयाबीन खरेदीमध्ये प्रति क्विंटल सरासरी ३७२.१८ रु. खर्च होतो. बोलताना सोयाबीन खरेदी म्हणजे काय शेतकऱ्यांकडून सोयाबीन उतरवून घ्यायचं, आपल्या इथून भरायचं आणि प्रक्रिया उद्योजकाकडे टाकून यायचं... ही बाब खूप साधी वाटते. पण याला जवळपास ३७० रु. प्रति क्विंटल इतका खर्च होतो. यात काही कंपन्यांनी खर्चात बचत केली, तरी किमान २२५ रु. प्रति क्विंटल खर्च होतोच होतो.

शिवाय सोयाबीनच्या भावात सतत चढ-उतार सुरूच असतात. त्यामुळे त्यातही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त सोयाबीन खरेदी पॅरामीटर सामान्यतः १०: २: २ असतात आणि आपल्या मालात यापैकी काही जास्त झाले तर त्याचे नुकसान वेगळे. हे टाळण्यासाठी एक तर खराब मालाचा ढीग वेगळा ठेवावा किंवा व्यवस्थित पाला करून मिक्स करावे; जेणेकरून सोयाबीन पॅरामीटर १०: २: २ च्या मर्यादेत राहतील.

खरेदीचे आकारमान व कार्यक्षमता

हे सर्व समजून घेतल्यास पहिली बात लक्षात येते ती ही, की खरेदीचे आकारमान व कार्यक्षमता (स्केल व इफिशियन्सी) वाढविल्याशिवाय व्यवसाय नफ्यात आणणे अगदीच कठीण आहे. या शिवाय सप्लाय करत असलेला माल कमी असेल तर प्रक्रिया उद्योजकसुद्धा विशेष वाढीव काही देत नाही. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांनी आपण करत असलेल्या प्रत्येक व्यवहारात बारकावा, स्केल व इफिशियन्सी आणणे अत्यंत आवश्यक आहे.

गणित हा विषय मुळातच शेतकऱ्यांच्या आवडीचा नाही. जेव्हा केव्हा हिशेब करण्याची वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांचे ठरलेले उत्तर म्हणजे ‘लिहून कशाला टेंशन वाढवायचं/ हिशेब केल्यास टेंशन येतं...’ पण गोष्टी लिहून ठेवल्यास सुधारणा करता येतात, कुठे बचत करता येईल हे आपल्या लक्षात येते. उद्योजक होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांच्या पहिल्या पिढीने, शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक शेतकऱ्यांनी तर या बाबींची काळजी घ्यायलाच हवी, नाही का?

९०२१४४०२८२

(लेखक बालाघाट फार्म्स, बीडचे संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com