Chana Procurement : परभणीत हमीभावाने हरभरा खरेदी दोन केंद्रांवर सुरू

राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ८ केंद्रांवर ७ हजार ८१२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली.
Chana Procurement
Chana Procurement Agrowon

Chana Market Update परभणी ः या वर्षीच्या (२०२२-२३) हंगामात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत (MSP Procurement Scheme) हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाने (नाफेड) मंजुरी दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत सोमवार (ता. १३) पर्यंत १५ हजार ७२५ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे.

सर्व केंद्रचालकांना खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी (ता. १४) परभणी आणि सोनपेठ येथील केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू झाली. हिंगोली जिल्ह्यातील केंद्रावर बुधवारी (ता. १५) हरभरा खरेदी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

Chana Procurement
Chana MSP : हरभरा यंदा तरी हमीभावाचा टप्पा गाठेल का?

राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ८ केंद्रांवर ७ हजार ८१२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली.

Chana Procurement
Chana Market : नाफेडची खरेदी, उत्पादन घटीचा हरभऱ्याला आधार

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कनेरगाव, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ), सेनगाव, साखरा या ७ केंद्रांवर ७ हजार ५१९ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.

परभणी येथील औद्योगिक वसाहतीमधील खरेदी केंद्रावर मंगळवारी (ता. १४) हरभरा खरेदी सुरू झाली. या वेळी जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रताप देशमुख, तालुका सहायक निबंधक (सहकार संस्था) माधव यादव, केंद्र प्रमुख माणिक नीलवर्ण आदींसह शेतकरी उपस्थित होते.पहिल्या दिवशी नोंदणीकृत २५ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर हरभरा घेऊन येण्यासाठी एसएमएसद्वारे संदेश पाठवले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com