
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ केंद्रापैकी केवळ चार केंद्रावरून २१०१ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची (Chana MSP) आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement) ९ केंद्र सुरू करण्यात आली. या केंद्रांपैकी केवळ गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद व पाचोड केंद्रावरून आधारभूत किमतीने हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.
आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी नोंदणीकरता सर्व नऊ केंद्रांवर प्रतिसाद मिळाला. त्यापैकी फुलंब्री केंद्रावरून २४, गंगापूर ९५, छत्रपती संभाजीनगर २१७, कन्नड एक, खुलताबाद ५७, पाचोड ४१, सिल्लोड एक, सोयगाव चार तर वैजापूरच्या केंद्रावरून २१ शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती.
आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी नोंदणीची मुदत ३१ मार्चला संपली नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात नोंदणी करता मुदतवाढ मिळाली नाही.
दुसरीकडे ऑनलाइन पीक पेरा, हेक्टरी केवळ आठ क्विंटल हरभरा खरेदीची मर्यादा, यामुळे शेतकऱ्यांना आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी आपली नोंद करणे अडचणीचे ठरले.
त्यामुळे बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने हरभरा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
जिल्ह्यात केवळ ४६१ शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंद करता आली त्यापैकी ३३२ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले. तर १६९ शेतकऱ्यांकडून २१०१ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली.
त्यामध्ये गंगापूरच्या केंद्रावरून ५६ शेतकऱ्यांकडील ६८२ क्विंटल छत्रपती संभाजी नगरच्या केंद्रावरून २३ शेतकऱ्यांकडील ३२५ क्विंटल, खुलताबादच्या केंद्रावरून ३६ शेतकऱ्यांकडील २१५ क्विंटल तर पाचोड येथील केंद्रावरून ५४ शेतकऱ्यांकडील ८७८ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची आधारभूत किमतीने खरेदी केली गेली आहे.
पुढील आठवड्यात ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदी केला जाण्याची शक्यता आहे.
खरेदी केलेल्या एकूण हरभऱ्यापैकी १६८१ क्विंटल ५० किलो हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला असून ४२० क्विंटल हरभरा अजूनही गोदामात साठविणे बाकी असल्याची माहिती जिल्हा पणन विभागाच्या सूत्रांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.