Vegetable Market : पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर

दिवाळीनिमित्त महाविद्यालयांसह विविध कार्यालयांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे खाणावळी बंद असल्याने विविध भाजीपाल्यांची मागणी घटली होती. मात्र आवकदेखील कमी राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते.
Vegetable Market Rate
Vegetable Market RateAgrowon

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) फळभाज्यांची आवक (Vegetable Arrival) गेल्या आठवड्याच्या तुलनेत संतुलित होती. पावसामुळे आवक कमीच असून, रविवारी (ता. २३) सुमारे ९० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दिवाळीनिमित्त महाविद्यालयांसह विविध कार्यालयांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे खाणावळी बंद असल्याने विविध भाजीपाल्यांची मागणी (Vegetable Demand) घटली होती. मात्र आवकदेखील कमी राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर (Vegetable Rate) स्थिर होते.

Vegetable Market Rate
Vegetable Cultivation : शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल

आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ३ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून २ टेम्पो शेवगा, इंदूर येथून २ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून ३ टेम्पो घेवडा, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, मध्य प्रदेशातून लसूण सुमारे ८ ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० पोती, टोमॅटो सुमारे ७ हजार क्रेट्स, फ्लॉवर आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, हिरवी ७ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, गाजर २ टेम्पो, मटार ४० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, कांदा सुमारे ८० ट्रक, आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक आवक झाली होती.

Vegetable Market Rate
Vegetable Farming : वेलवर्गीय भाज्यांना दिली ऊस, मोगऱ्याने साथ

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव - कांदा : १८०-२४०, बटाटा : १८०-२५०. लसूण : १००-५००, आले : १५०-३५०, भेंडी : २५०- ३००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : २००-३००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १००-१६०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : १५०-२००, वांगी : ३००-४५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : २००-२५०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ५००-६००, जाड : २५०-३००, शेवगा : १०००-१२००, गाजर : १५०-२००, वालवर : ३५०-४००, बीट : २५०-३००, घेवडा : ३००, कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : स्थानिक: १४००-१६००, पावटा : ४००- ४५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची ५० हजार जुड्यांची आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-२०००, मेथी : १२००-१६००, शेपू : ६००-८००, कांदापात : ६००-१५००, चाकवत : ६००-१५००, करडई : ४००- ६००, पुदिना : २००-६००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१८००, राजगिरा : ४००-८००, चुका : ८००-१२००, चवळई : ४००-७००, पालक : १२००-२०००.

फळ बाजार

फळ बाजारात रविवारी (ता. २३) लिंबाची सुमारे २ हजार गोणी, डाळिंब ४० टन, पपई ८ टेम्पो, चिकू ४०० बॉक्स, मोसंबी ५० टन, संत्रा २० टन, पेरू सुमारे ७०० क्रेट, कलिंगड ३ तर, खरबूज २ पिकअप, सीताफळ ४० टन आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (गोणीस) - २५०-४५०, डाळिंब (किलो) गणेश - १०-४०, भगवा ५०-२००, आरक्ता २०-६०, पपई प्रति किलो -१२-१६, पेरू (२० किलो) -३००-६००, सीताफळ - २०-१००, कलिंगड १२-२० खरबूज ३०-४०, मोसंबी ३ डझन २२०-३५०, ४ डझन ११०-२३०. संत्रा (१० किलो) २००-५००.

फुलबाजार ः राज्याच्या विविध भागांतील सततच्या पावसाचा फटका फुलांना बसला असून, ऐन दिवाळीच्या हंगामात झालेल्या पावसाने रविवारी (ता. २३) पुणे बाजार समितीच्या फूल विभागात फुलांच्या झालेल्या आवकेत सुमारे ७० टक्के फुले भिजलेली आणि डागाळलेली होती. यामुळे चांगल्या दर्जाच्या फुलांना मागणी वाढल्याने दर वाढले होते.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-१००, गुलछडी : २००-३००, ॲस्टर : जुड्या ३०-५०, सुटा २००-२५०, बिजली : १००-१५०, कापरी : २०-८०, शेवंती : ६०-२००, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : ३०-६०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, जरबेरा : ३०-५०, कार्नेशियन : १२०-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलीयम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लाडिओ (१० काड्या) : ८०-१५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com