Grape Rate : निर्यातक्षम द्राक्षास गतवर्षीपेक्षा दर कमी

गेल्यावर्षी जिल्ह्यातून ५ हजार ९४७ शेतकऱ्यांनी नोंदणी करून २ हजार ७६६ हेक्टरवरील द्राक्षांची १६ हजार ३५८ टन द्राक्षे निर्यात झाली होती. गतवर्षी निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस ९० रुपये असा दर मिळाला होता.
Grape Rate
Grape RateAgrowon

Grape Market Update सांगली ः जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस (Grape Export) गती आली आहे. आतापर्यंत ४ हजार ६०५ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत निर्यातक्षम द्राक्षास पाच ते दहा रुपयांनी दर (Grape Rate) कमी आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील द्राक्ष हंगामाला (Grape Season) गती आली आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष विक्रीला जातात. जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी ९ हजार ५१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ५३०९ हेक्टरवरील द्राक्ष सातासमुद्रापार जाणार आहेत.

गेल्यावर्षी जिल्ह्यातून ५ हजार ९४७ शेतकऱ्यांनी नोंदणी करून २ हजार ७६६ हेक्टरवरील द्राक्षांची १६ हजार ३५८ टन द्राक्षे निर्यात झाली होती. गतवर्षी निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस ९० रुपये असा दर मिळाला होता.

हंगाम मध्यावर आल्यानंतर प्रति किलोस ८५ रुपये असा दर होता. हंगाम संपेपर्यंत द्राक्षाचा दर स्थिर राहिला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Grape Rate
Grape Rate : द्राक्षाच्या दरावर थंडीचा परिणाम

वास्तविक पाहता, यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यातून द्राक्षाची निर्यात संथगतीने सुरू होती. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून द्राक्ष निर्यातीस गती आली आहे.

जिल्ह्यातून आखाती देशात १९५ कंटेनर म्हणजे २ हजार ९२५ टन तर युरोपियन देशात १४० कंटेनर म्हणजे १ हजार ६८० टन अशी एकूण ४ हजार ६०५ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत.

Grape Rate
Grape Crop : तापमानाचं द्राक्ष हंगामावर संकट

यंदा हंगामाचा प्रारंभ ८० रुपये असा दर शेतकऱ्यांना मिळाला. अगदी गेल्या पंधरा दिवसांपर्यंत दर स्थिर होते. मात्र, त्यानंतर दरात ५ ते १० रुपयांची घसरण झाली. सध्या द्राक्षाला प्रति किलोस सरासरी ७० असा दर मिळत आहे. एका आठवड्यात द्राक्षाचे दर कमी झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला दर चांगले होते. मात्र, गेल्या आठ दिवसांत पाच ते १० रुपयांनी दर कमी झाले आहे. द्राक्षाला प्रति किलोस ८० रुपयांपेक्षा जास्त जर मिळाला तरच आर्थिक ताळमेळ लागेल.

- अमित गुरव,निर्याक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, पळशी, ता. खानापूर

द्राक्ष निर्यात दृष्टिक्षेपात (निर्यात टनात)

वर्ष...शेतकरी संख्या...निर्यात

२०१९...११४७...१३ हजार ०६२

२०२०...२१३५...१८ हजार ०२५

२०२१...४२८३...२० हजार ०२९

२०२२...५९४७...१६ हजार ३५८

२०२३...९५१६...४ हजार ६०५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com