Soybean Market : दरवाढीच्या प्रतीक्षेतील सोयाबीन विक्रीला

Soybean Arrival : आगामी खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना बाजारात सोयाबीनची आवक अचानक वाढू लागली आहे. दरवाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेले हे सोयाबीन बाहेर यायला सुरुवात झाली आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Akola News : आगामी खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना बाजारात सोयाबीनची आवक अचानक वाढू लागली आहे. दरवाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेले हे सोयाबीन बाहेर यायला सुरुवात झाली आहे.

अकोला बाजार समितीत गुरुवारी (ता.१०) तब्बल पावणे चार हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली. तर शुक्रवारी (ता.११) ३३५१ क्विंटल आवक झाली. सोयाबीनचा सरासरी दर पाच हजार रुपयांवरून एकाच दिवसांत ५० रुपयांनी कमी होऊन ४९५० रुपये मिळाला.

Soybean Market
Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करा

यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या दरात तेजी मिळेल, अशी अपेक्षा बाळगत अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केले नव्हते. हंगाम तोंडावर आलेला असताना दरात फारशी तेजी होत नसल्याने अखेरीस आता शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत आहेत. यामुळेच बाजारातील उलाढाल वाढली आहे.

Soybean Market
Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात नरमाई

या आठवड्यात अकोल्याच्या बाजाराचा आढावा घेतला असता सोयाबीनची आवक वाढू लागली आहे. हजार पोत्यांपासून तर आता पावणेचार हजार पोत्यांपर्यंतचा हा वाढता आलेख आहे. एकाच आठवड्यात सोयाबीन आवकेने हा मोठा पल्ला गाठला आहे. गुरुवारी (ता.११) सोयाबीन किमान ३५०० व कमाल ५११५ पर्यंत विक्री झाले. सरासरी दर ४९५० रुपये मिळाले.

शेतकऱ्यांची दरवाढीची अपेक्षा फोल

शेतकरी सोयाबीनच्या दरवाढीची आशा बाळगून होते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता साठवून ठेवले. हे शेतकरी दरवाढीच्या आशेने थांबले होते. हंगामासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज, पीककर्ज भरण्यासाठी पैसे हवे असल्याने साठवलेले सोयाबीन हळूहळू बाहेर येत आहे. येत्या काळात ही आवक आणखी वाढण्याची शक्यता बाजार पेठेतील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com