बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत ५२ टक्क्यांची वाढ

चीन आणि बांगलादेशमधून झालेल्या मोठ्या प्रमाणातील खरेदीच्या जोरावर पहिल्या नऊ महिन्यात बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात १६० लाख टन निर्यातीचे लक्ष्य पार करण्याची निर्यातदारांना अपेक्षा आहे.
Rice Export
Rice Export

चीन आणि बांगलादेशमधून झालेल्या मोठ्या प्रमाणातील खरेदीच्या जोरावर पहिल्या नऊ महिन्यात बिगर बासमती तांदळाच्या (Non Basmati Rice) निर्यातीत (Exports) ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात १६० लाख टन निर्यातीचे लक्ष्य पार करण्याची निर्यातदारांना (Exporters) अपेक्षा आहे.

मागील वर्षी याच कालावधित झालेल्या ८२.५ लाख टन निर्यातीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधित बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीने १२५.३ लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. मुल्याच्या स्वरूपात पाहायचे झाल्यास निर्यात ४६ टक्क्यांनी वाढून ४.४८ अब्ज डॉलर झाली आहे. मागील वर्षी याच कालावधित ३.०७ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. २०२०-२१ या हंगामात भारताच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात १३० लाख टन होती. या तुलनेत मागील वर्षी ५० लाख टन तांदळाची निर्यात झाली होती. ज्याचे मूल्य २.०३४ अब्ज डॉलर एवढे होते.  

चालू आर्थिक वर्षात आम्ही १६० लाख टन तांदूळ निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार, निर्यात १७० लाख टनांपर्यंत पोहचू शकते, असे तांदूळ  निर्यातदार संघटनेचे (The Rice Exporters Association) अध्यक्ष बी.व्ही. कृष्णराव (BV Krishna Rao) यांनी म्हटले आहे.

प्रमुख खरेदीदार  -

यावर्षीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खरेदीदार बांगलादेशने (Bangladesh) १५.३० लाख टन तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे. जी मागील वर्षी याच कालावधित केवळ १३ हजार ८११ टन एवढी होती. "गेल्या वर्षी जानेवारीपासून अग्रगण्य खरेदीदार असलेल्या बांगलादेशची खरेदी सध्या मंदावली आहे. तर चीनची (China) खरेदी १० लाख टनांवर आहे. मक्याचे भाव जोपर्यंत जास्त आहेत तोपर्यंत चीनची खरेदी अधिक होईल", असे राव म्हणाले.

एप्रिल-डिसेंबर दरम्यान चीनने सुमारे ९.०५ लाख टनांची आयात केली आहे. जी गेल्या वर्षी याच कालावधित ३३ हजार ७०५ टन एवढी होती. मुल्याच्या स्वरुपात पाहायचे झाल्यास भारताकडून चीनने २७५ दसलक्ष डॉलर्सची खेरदी केली आहे. त्याचप्रमाणे व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, सेनेगल, सोमालिया आणि इंडोनेशियायासारख्या देशांचीही खरेदी वाढली आहे. व्हिएतनामने यंदा ५.६६ लाख टनांची आयात केली आहे.

दरम्यान, नेपाळ, मोझांबिक यांसारख्या काही बाजारपेठा स्थिर आहेत. तर मलेशिया, सौदी अरेबिया, यूएई, रशिया आणि इराकसह अनेक देशांनी त्यांची खरेदी कमी केली आहे. पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, भारतातील खरीपातील मुख्य पीक असलेल्या तांदळाचे १०७ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. खरीपातील सर्वसाधारण ३९५.६६ लाख हेक्टरच्या तुलनेत ४११.४६ लाख हेक्टरवर विक्रमी पेरणी झाली आहे. तर चालू रब्बी हंगामातील ४२.५ लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत घट होवून २३.६१ लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com