शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत पुढचे तीन महिने वीज तोडणार नाही - उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

महावितरणकडून सुरू असलेल्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिल्याची घोषणा राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Power Minister Dr. Nitin Raut) यांनी मंगळवारी (ता. १५) विधानसभेत केली.
Dr. Nitin Raut
Dr. Nitin Raut

महावितरणकडून सुरू असलेल्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिल्याची घोषणा राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Power Minister Dr. Nitin Raut) यांनी मंगळवारी (ता. १५) विधानसभेत केली. कर्जाच्या बोजामुळे महावितरणची स्थिती गंभीर असल्याचे सांगताना राऊत यांनी ही घोषणा केली आहे. याशिवाय वीज पुरवठा खंडित (Poer Supply Cut) केलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचीही घोषणा राऊत यांनी केली आहे. 

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR)

यावेळी बोलतना राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत पुढील तीन महिने वीज तोडणीची कारवाई तीन महिन्यांसाठी तात्पुरती थांबविण्यात येत आहे. (Power Supply Of Farmers Will Be Restored Says Nitin Raut) तसेच ज्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा थकीत वीजबिलाच्या कारवाईमुळे खंडित करण्यात आला आहे, अशा शेतकऱ्यांचा वीज पुरवठाही पुर्ववत केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहात सांगितले. तसेच शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज देण्यासंदर्भात समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल, असेही राऊत यावेळी म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा खंडित करण्याचा मुद्दा सत्ताधारी पक्षातील सदस्यांसह विरोधी पक्षानेही लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.   राऊत यांच्या या घोषणेनंतर शतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून सरकारवर हल्लाबोल करत शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या महावितरणच्या कारवाईमुळे शेतकरी संताप व्यक्त करत होते. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com