पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र शेतकऱ्यांचा गव्हाकडेच ओढा

पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार हेक्टरवरून ५४ हजार हेक्टरवर झाली आहे. मोहरीच्या लागवड जवळपास ६४ टक्क्यांनी वाढली आहे.
Mustard Sowing
Mustard Sowing

वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार हेक्टरवरून ५४ हजार हेक्टरवर झाली आहे. मोहरीच्या लागवड जवळपास ६४ टक्क्यांनी वाढली आहे. पंजाबातील मोहरीच्या लागवड (Mustard Sowing) क्षेत्रात जरी वाढ होत असली तरी १९८८ पर्यंतच्या १ लाख ७० हजार हेक्टरपेक्षा लागवडी खालील क्षेत्र कमीच आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी जर बाजारभावाने मोहरी (Mustard) विकली, तरी त्यांना गव्हापेक्षा (Wheat) २८ टक्के नफा मिळू शकतो ही वस्तूस्थिती आहे.  

ऑक्टोबर २०२१ मध्ये मोहरीला ७५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला होता, ही गोष्ट लक्षात घेतल्यास यंदा शेतकऱ्यांनी मोहरीला पसंती देणं अपेक्षीत होते. कारण १.५ टन प्रतिहेक्टरी उत्पादकता धरल्यास शेतकऱ्यांना ८०,,८६५ रुपयांचा हेक्टरी नफा झाला असता. यात ए2+एफएल या सुत्रानुसार २१०९ रुपयांचा उत्पादन खर्च धरला आहे. पण तरीही शेतकरी याच सुत्रानुसार हेक्टरी ५ टन उत्पादकता असलेल्या आणि ६३ हजार ३५० रुपये हेक्टरी नफा देणाऱ्या गव्हाच्या मागे धावतात. शेती मुल्य व किंमत आयोगाच्या माहितीनुसार गव्हाचा उत्पादन खर्च क्विंटलमागे ७४८ इतका आहे.

पंजाबचे कृषी आयुक्त (Agriculture Commissioner) बलविंदर सिंग सिद्धू (Balvindar sing Siddhu )यांनी म्हटलंय की, गव्हाच्या पिकात कोणताही धोका नाही. कारण शेतकऱ्यांना हे माहित आहे की गव्हाची खरेदी ही किमान आधारभूत किमतीने होऊ शकते. मागे वळून पाहिले, तर एखाद्या विशिष्ट पिकाच्या मागे गेल्यास त्याचे दर घसरतात. या  सुत्राला मोहरीही अपवाद नाही. बरनाला जिल्ह्यातील पाल सिंग या शेतकऱ्याच्या मते, मोहरीला खात्रीशीर भाव नाही. पाल सिंग या शेतकऱ्याने सहा एकरांवर गहू आणि तीन एकरांवर बटाट्याची लागवड (Potato Cultavation) केली आहे. जर मोहरीपासून मिळणारे उत्पन्न गव्हाप्रमाणेच असेल, तर त्यांच्या सारख्या शेतकऱ्यांना मोहरीचे पीक घ्यायला आवडेल, असेही पाल यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com