यूपीत ६२३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत !

यावेळी किसान आंदोलन आणि संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलेल्या विरोधी प्रचारामुळे भाजपला विभागातील संख्याबळ टिकवण्यासाठी समाजवादी पक्षासोबत संघर्ष करावा लागणार आहे. भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
UP Election Voting
UP Election Voting

उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पहिल्या रणसंग्रामाला आज सुरूवात झाली आहे. गुरुवारी पहिल्या टप्पात पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघासाठी (Assembly Constituency) मतदान झाले. निवडणूक आयोगाने (Election commission) दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७. ७९ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.   

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी (Additional Chief Election Officer) बी. डी. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांशी ठिकाणी शांततेत मतदान पार पडले आहे. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्समध्ये  (Electronic Voting Machine) तांत्रिक बिघाड (Technical error) झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्या ठिकाणी पर्यायी मशिन्स पाठवण्यात आल्याचे तिवारी म्हणाले आहेत.

५८ मतदारसंघात यावेळी ६२३ उमेदवार (Candidates) मैदानात होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपाला चांगलीच आघाडी मिळाली होती. जाट समुदायानेही भाजपला निर्णयाने असा कौल दिला होता. 

या ५८ मतदारसंघापैकी २४ मतदारसंघात जाट समुदायाचे मतदान निर्णायक ठरणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा, जाट आणि मुस्लिमबहुल विभाग मानल्या जाणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशातील मतदानाकडे यंदा सगळ्यांच्याच नजर लागल्या आहेत. उत्तर प्रदेशात सत्तास्थापनेच्या दृष्टीनेही पश्चिम उत्तर प्रदेशातील बलाबल महत्वाचे मानले जाते. 

व्हिडीओ पहा 

यावेळी किसान आंदोलन आणि संयुक्त किसान मोर्चाकडून (Sanyukt Kisan Morcha) करण्यात आलेल्या विरोधी प्रचारामुळे भाजपला विभागातील संख्याबळ टिकवण्यासाठी समाजवादी पक्षासोबत संघर्ष करावा लागणार आहे. भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 

या पट्ट्यावर प्रभाव असणारे राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी यांनी यावेळी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्यासोबत युती केल्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com