कसं असेल सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट ?

या समाजातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून असून या घटकांचे शेतीवरील अवलंबन कमी करुन त्यांना विविध क्षेत्रातील रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना राबवणं, शेतकरी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपाययोजना करणं करण्यासाठी सारथी संस्थेकडून टप्याटप्याने उपाययोजना राबवण्यात येणारेत.
SARTHI VISION  DOCUMENT
SARTHI VISION DOCUMENT

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी (लक्षित गट) या समाजातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी या विविध घटकांच्या सक्षमीकरणासाठी सारथी (Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute) संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम राबवायला हवेत, यासाठी राज्यभरातून सूचना मागविण्यात येताहेत. 

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (पुणे) म्हणजेच सारथी या संस्थेकडून २०३० सालापर्यंतचा भविष्यकालीन योजनांचा आराखडा (Vision Document) तयार करण्यात येतोय. 

नव्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग, तरुणांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी कौशल्यवृध्दी व कृषी प्रक्रिया उद्योग (Agriculture process industry ) प्रशिक्षण, शालेय शिष्यवृत्ती,महिला सक्षमीकरणाकरिता नवे उपक्रम सुरू करण्याचा विचार प्रस्तावित आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयात संस्थेच्या उद्दीष्टांचा समावेश करण्यात आलाय.

या समाजातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून असून या घटकांचे शेतीवरील अवलंबन कमी करुन त्यांना विविध क्षेत्रातील रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना राबवणं, शेतकरी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचा तसेच महिलांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपाययोजना करणं करण्यासाठी सारथी संस्थेकडून टप्याटप्याने उपाययोजना राबवण्यात येणारेत.

हा आराखडा सर्वसमावेशक व व्यापक होण्यासाठी सारथी संस्थेने कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबवायला हवेत, याबाबत ३१ मार्च २०२२ पर्यंत लेखी स्वरूपात सूचना पाठवण्याचं आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (Ashok Kakade) यांनी केलंय. 

व्हिडीओ पहा- 

आर्थिक मागासलेपणावरून मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे. या समाजघटकांच्या आर्थिक, सामाजिक शैक्षणिक विकासासाठी सारथीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येताहेत.या प्रवर्गाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास आणि विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सारथी ही संस्था दि. १९ फेब्रुवारी, २०१९ पासून कार्यरत आहे.  

सारथी संस्थेमार्फत या समाजाच्या विद्यार्थ्यांच्या  एम. फील (M. Phil) व पीएच.डी (PhD) अभ्यासक्रमासाठी अधिछात्रवृत्ती, संघ लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोग पूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण शुल्क, विद्यावेतन व पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक साहाय्य हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येताहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com