Crop insurance : बुलडाणा जिल्ह्यात १०३ कोटींची भरपाई निश्‍चित

बुलडाणा ः जिल्ह्यात खरीप हंगामात पीकविम्याचे काही दावे मंजूर करण्यात आले असून, सुमारे १०३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम विमा कंपनीकडून निश्‍चित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

बुलडाणा ः जिल्ह्यात खरीप हंगामात पीकविम्याचे (Crop insurance Claim) काही दावे मंजूर करण्यात आले असून, सुमारे १०३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) रक्कम विमा कंपनीकडून निश्‍चित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांना दिलेले पत्र सध्या समाज माध्यमात धुमाकूळ घालत आहे.

Crop Insurance
Crop Insurance : अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

बुलडाणा जिल्ह्यात या खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत दोन लाख ३५ हजार ७५१ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी दोन लाख २४ हजार ४८९ सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ११ हजार २६२ सूचनांचे सर्वेक्षण प्रगतिपथावर आहे.

सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचनांपैकी १ लाख ५६ हजार ५६ सूचनांसाठी सुमारे एकशे तीन कोटी ७३ लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम विमा कंपनीकडून निश्‍चित झाली आहे. अद्याप ४५ हजार ८४१ सूचनांची नुकसान भरपाई निश्‍चित होणे बाकी आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीक विमा- चेष्टा नको, हक्काचे पैसे द्या

येत्या चार ते पाच दिवसांत ही निश्‍चित झालेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कंपनीमार्फत जमा केली जाईल. याव्यतिरिक्त काढणीपश्‍चात नुकसानबाबी अंतर्गत प्राप्त झालेल्या सूचनांवर योजनेच्या निकषानुसार पुढील कार्यवाही प्रगतिपथावर आहे.

विमा योजनेतील तरतुदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असेही आवटे यांनी स्पष्ट केले होते. डिक्कर यांनी सहकाऱ्यांसह आवटे यांची भेट घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याला उत्तर म्हणून हे पत्र देण्यात आलेले आहे.

विमा भरपाईचे श्रेय घेण्यासाठी धडपड

पीकविमा भरपाईच्या मुद्द्यावर जिल्ह्यात सध्या श्रेय घेण्याची स्पर्धा दिसून येत आहे. याबाबत सोशल मीडियावर तशा पोस्ट जोराने फिरवल्या जाऊ लागल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षण प्रक्रियेच्या आकडेवारीनुसार १०३ कोटींचा आकडा निश्‍चित झाला. उर्वरित शेतकऱ्यांचे सर्वेक्षण प्रकरणे पूर्ण झाल्यानंतर यात आणखी वाढीची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com