Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन लाभ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण जोमाने

शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदानात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पात्र असलेल्या सभासद शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवण्यात आली आहे.
Government funds
Government fundsAgrowonAgrowon

अकोला ः शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदानात (Farmer Incentive Subsidy) जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पात्र असलेल्या सभासद शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवण्यात आली आहे. यापैकी १९ हजार शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली असून, या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे (Aadhar Verification) काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती दि. अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे बुधवारी (ता.१९) घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Government funds
Farmer Incentive Subsidy : सांगलीत शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा

या वेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाकडून नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Government funds
Farmer Incentive Subsidy : ‘प्रोत्साहनपर’ चा साडेआठ हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

यासाठी मागील तीनपैकी दोन वर्षांत नियमित पीककर्ज भरणा केलेल्यांची नावे शासनाकडून मागवण्यात आली होती. जिल्हा बँकेने अशी यादी तयार करून शेतकऱ्यांची नावे पाठवली होती. यापैकी पहिल्या यादीत १९ हजार पात्र शेतकऱ्यांची नावे आली आहेत. या शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अत्यावश्‍यक होते.

हे लक्षात घेता बँकेने आपली यंत्रणा कामाला लावली. सुमारे ३०० मशिनद्वारे बायोमेट्रिक करण्यात आले. आतापर्यंत साडेअठरा हजारांवर शेतकऱ्यांचे असे प्रमाणीकरणसुद्धा झाले आहे. पुढील टप्प्यात शासन या शेतकऱ्यांच्या खात्यात संबंधित निधी जमा करणार असल्याचे यापूर्वीच शासनाकडून जाहीर झालेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com