Cashew Crop Insurance : काजूसाठी विमा योजना

या योजनेअंतर्गत काजू ५ वर्षे वय झालेल्या पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
Cashew
CashewAgrowon

काजू पीकविम्यासाठी (Crop Insurance) अधिसूचित कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर संदर्भ हवामान केंद्र (Weather station) आकडेवारी वरुण नुकसानभरपाई अंतिम केली जाते.

Cashew
Cashew Processing : काजू प्रक्रिया, पीठनिर्मिती उद्योगात महिला समूहाची ओळख

संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण

योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२२

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता

हवामान धोके---विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर---शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर

अवेळी पाऊस, कमी तापमान---१,००,०००----५,००० ते १२,५००

गारपीट---३३,३३३ ----१,६६७

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा

जिल्हे---विमा कंपनीचे नाव व पत्ता

सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, नाशिक ---रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

ठाणे, कोल्हापूर--एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

रायगड---भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग ः

१) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.)

५) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

६) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला ५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.

७) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

संपर्क ः संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

(लेखक कृषी विभागामध्ये कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण) आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com