Farmer Incentive Scheme : ‘प्रोत्साहन’पासून निम्मे शेतकरी वंचित

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना लागू करण्यात आली आहे.
Government Scheme
Government SchemeAgrowon

अमरावती : नियमित पीककर्ज (Crop Loan) भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Mahatama Phule Farmer Loan Waive Scheme) प्रोत्साहन लाभ देण्यात येत असला तरी अद्याप जिल्ह्यातील निम्मे शेतकरी प्रतीक्षा यादीवरच आहेत.

त्यांना प्रत्यक्षात केव्हा लाभ मिळेल हा प्रश्न मंत्रालयीन पातळीवर लावण्यात आलेल्या फिल्टरमुळे अनुत्तरीत आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना लागू करण्यात आली आहे.

तत्काळ अनुदान देण्याची शिंदे- फडणवीस सरकारची घोषणा मात्र निम्मीच अस्तित्वात आली आहे. सहकार विभागाने जिल्ह्यातील ३२ हजार ४८६ शेतकऱ्यांची यादी या योजनेंतर्गत शासनाला पाठविली आहे.

अनुदान देताना या शेतकऱ्यांसाठी मंत्रालयीन पातळीवर फिल्टर लावण्यात आले आहेत. त्यामधून जे बाहेर पडतील त्यांना लाभ देण्यात येत आहे.

आतापर्यंत १८ हजार ८१३ शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर झाल्या असून १४ हजार ३४५ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे.

१३ हजार ६७३ शेतकरी वेटिंगवर आहेत. ६५ कोटी १० लाख रुपये इतके अनुदान वाटप झाल्याची माहिती महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवरील डॅशबोर्डवर प्रकाशित करण्यात आली आहे.

Government Scheme
Subsidy : शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान लटकले

प्रोत्साहन लाभ देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणखी दोन याद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्याची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.

त्यासाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात लाभ केव्हा मिळणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

जिल्ह्यातील स्थिती

एकूण कर्जदार शेतकरी - ३२,४८६

विशिष्ट क्रमांक प्राप्त - १८,८१३

ई-केवायसी प्रमाणीकरण - १७,३७७

प्रत्यक्षात लाभ - १४,३४५

अनुदान वाटप - ६५.१० कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com