Government Scheme : शासकीय योजनांची अंमलबजावणी करा

विकास कामांचे नियोजन करताना सामूहिक तसेच वैयक्तिक योजनेच्या लाभांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा.
Government Scheme
Government SchemeAgrowon

सोलापूर ः सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना (Government Scheme) राबविल्या जातात.

या योजनांची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी (MP Dr. Jai Siddheshwar Mahaswami) यांनी दिल्या. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा (दिशा) च्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या बैठकीस खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे उपस्थित होते.

खासदार डॉ. महास्वामी म्हणाले, विकास कामांचे नियोजन करताना सामूहिक तसेच वैयक्तिक योजनेच्या लाभांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तातडीने पात्र लाभार्थींना घरकुल अनुदान द्यावे. जिल्हयांतर्गत रस्ते तसेच महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यात याव्यात.

जिल्ह्यात शेतकरी, ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत सर्व मूलभूत सोयीसुविधा गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही यावेळी खासदार डॉ.महास्वामी यांनी दिल्या. शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी विद्युत उपकेंद्रासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावेत.

Government Scheme
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी शासकीय योजना अन सद्यःस्थिती

प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सडक योजनेची जिल्ह्यातील रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होण्यासाठी गुणवत्तापूर्ण काम न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशा सूचना खासदार ओम राजे निंबाळकर यांनी यावेळी दिल्या.

आधार कार्डसाठी मोहीम राबवणार...

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात सर्व योजनांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत माहिती देऊन प्रलंबित कामे संबंधित विभागाकडून कालमर्यादेत पूर्ण करून घेतली जातील.

तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक केले आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच इतरांना आधार कार्ड संबंधित काही अडचणी येतात, यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून आधार कार्ड काढून देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com