MAGNET : ‘मॅग्नेट’च्या दुसऱ्या टप्प्यात शेतीमालाच्या प्रक्रियेला स्थान

महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ११ उत्पादन पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पिकाच्या मूल्यसाखळीमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्देश आहे.
MAGNET Project
MAGNET ProjectAgrowon

नागपूर : महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत (MAGNET Project) राज्यातील ११ उत्पादन पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पिकाच्या मूल्यसाखळीमध्ये (Crop value Addiction) खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्देश आहे. पुढील काळात या प्रकल्पात प्रक्रियेला (Processing) देखील प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती एशियन डेव्हलपमेंट बँकेचे (Asian Development Bank) भारतातील कार्यकारी संचालक समीर कुमार खरे यांनी दिली.

MAGNET Project
MAGNET Project : कृषिव्यवसाय, मूल्यसाखळीच्या विकासासाठी ‘मॅग्नेट’चे पाठबळ

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरमध्ये आयोजित मॅग्नेट प्रकल्पाचे आढावा बैठकीत ते बोलत होते. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्यकारी संचालक चाँटेल ओंग, सर्गोलो लुगार्सी, टोकियो कोनिशी, अनुप कुमार, आयआयआयएमचे संचालक भिमार्या मैत्री, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मॅग्नेटचे नागपूर विभागीय प्रकल्प संचालक अजय कडू यांची यावेळी उपस्थिती होती.

समीर कुमार खरे पुढे म्हणाले, राज्यातील डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल) व फुले या प्रमुख अकरा फलोत्पादन पिकांचा समावेश मॅग्नेट प्रकल्पात केला आहे. पहिल्या टप्प्यात उत्पादन पिकाच्या मूल्य साखळ्यांमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचा उद्देश आहे.

MAGNET Project
Magnet Project : मॅग्नेटला मिळणार कर्जाऐवजी अनुदान

फळे व भाजीपाल्यांचे काढणी पश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मूल्यवृद्धी करणे आणि वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे या बाबींचा समावेश आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या निधीतून हा प्रकल्प राबविला जात आहे. पहिल्या टप्प्यात उद्योजक, शेतकरी कंपन्या तसेच फळ व भाजीपाला उत्पादक संघाचा याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात या शेतीमालाच्या प्रक्रियेला देखील स्थान देण्यात आले आहे.

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या संचालक मंडळासमोर या प्रकल्पाचे अंमलबजावणीचा राज्यस्तरीय आढावा मांडता यावा याकरिता आयआयएम नागपूर येथे ही बैठक घेण्यात आली. वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे संत्रा व मोसंबी उत्पादकांना सध्या विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर करावयाच्या उपाययोजना, दर्जेदार फळ उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची गरज, त्याकरिता शासनाचा सहभाग अशा विविध मुद्द्यांबाबत महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ तसेच सुधीर जगताप यांनी या वेळी माहिती दिली.

दुसरी आढावा बैठक नागपूरमध्ये

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कार्यकारी संचालकांनी या वेळी शेतकऱ्यांना प्रकल्पाची अंमलबजावणी संदर्भात येत असलेल्या अडचणी प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून जाणून घेतल्या. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील दुसरी आढावा बैठक नागपूर येथे डिसेंबर अखेर किंवा जानेवारी घेतली जाईल, अशी घोषणा देखील या वेळी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com