Solar Pump : रत्नागिरीत ६८७ शेतकऱ्यांना सौरपंप वीज जोडण्या

‘महावितरण आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करून सहभागी करून घेण्यात येत आहे.
Solar Pump
Solar PumpAgrowon

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने सौरऊर्जेद्वारे (Solar Energy) शेतकऱ्यांना वीजपुरवठा (Solar pump Electricity) उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना (Solar Agriculture Pump Scheme) सुरू करण्यात आली.

जिल्ह्यातून १२२८ अर्ज शेतकऱ्यांनी महावितरणाकडे सादर केले होते. त्यापैकी ७४१ अर्ज पात्र ठरले असून, ६८७ शेतकऱ्यांना सौरपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

ते शेतकरी विजेसाठी स्वयंपूर्ण झाले आहेत. उर्वरित ४४ प्रस्तावातील त्रुटी दूर केल्यानंतर या ग्राहकांनाही जोडण्या दिल्या जाणार आहेत.

‘महावितरण आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करून सहभागी करून घेण्यात येत आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

सौर कृषिपंप बसविण्यासाठी महावितरणकडून पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली असून, ६८७ जोडण्या देण्यास ‘महावितरण’ला यश आले आहे.

‘महावितरण आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा देण्यात आला होता, अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरूपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आल्याने त्यांनाही या योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी करून घेण्यात आले.

Solar Pump
Akola News: वीजपुरवठ्यासाठी शिवसेनेचा ‘महावितरण’वर रुमणे मोर्चा

शेतकऱ्यांनी बॅटरी उपलब्ध करून दिल्यास पंपाबरोबर एक बल्ब व एक पंखा बसविण्याची व्यवस्था केली जात आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ अश्वशक्ती क्षमतेसाठी २५ हजार ५०० रुपये दहा टक्क्यांप्रमाणे तर अनुसूचित जाती-जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ रुपये रक्कम भरावी लागत होती. आता अनुक्रमे १६ हजार ५६० व ८ हजार २८० रुपये भरावे लागत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com