शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच पश्चिम उत्तर प्रदेशात मतदान ?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच पश्चिम उत्तर प्रदेशातील मतदान होईल, मतदार कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हिंदू-मुस्लिम ,मोहम्मद अली जिन्ना अशा मुद्यांना बळी पडणार नसल्याचा दावा राकेश टिकैत यांनी केला.
Mission UP
Mission UP

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून पश्चिम उत्तर प्रदेशात सुरु असलेले ध्रुवीकरणाचे (Polarisation) प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, इथे सरकारने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, विश्वासघात हेच प्रमुख मुद्दे असतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच पश्चिम उत्तर प्रदेशातील मतदान होईल, मतदार कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हिंदू-मुस्लिम ,मोहम्मद अली जिन्ना अशा मुद्यांना बळी पडणार नसल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चार्चे (Sanyukt Kisan Morcha)नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी केला आहे. 

संयुक्त किसान मोर्चाने मिशन उत्तर प्रदेश (Mission Uttar Pradesh) सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या मिशन अंतर्गत टिकैत सध्या भाजपविरोधी प्रचार करत आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेल्या संवादात टिकैत यांनी संयुक्त किसान मोर्चाची (Sanyukt Kisan Morcha) भूमिका स्पष्ट केली आहे.

१३ महिने आंदोलन केल्यावरही सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करणार नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे ? आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांवरील खटले असोत की आंदोलनात बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देणे असो, सरकारने कुठलाच शब्द पाळलेला नाही. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चा (Sanyukt Kisan Morcha) आता भाजपविरोधी प्रचार करणार आहे.

प्रत्येक मतदाराने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुम्ही काय करणार आहात? हा प्रश्न उमेदवाराला विचारायचा आहे, मिशन उत्तर प्रदेश मोहिमेत आम्ही मतदारांना हे आवाहन करत असल्याचे टिकैत यांनी सांगितले आहे. 

भाजपकडून हिंदू-मुस्लिम, मोहम्मद अली जिन्ना असे मुद्दे उगाळून पश्चिम उत्तर प्रदेशातील मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री गेल्या महिन्यापासून विशिष्ट समूहाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हिडीओ पहा- 

शेतकऱ्यांच्या उसाची (sugarcane) थकबाकी मिळालेली नाही, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वाढीव  वीजबिलांचे (Excessive Light Bills)   काय करणार यावर मुख्यमंत्री चकार शब्द बोलत नाहीत. या मुद्द्यांऐवजी त्यांना हिंदू-मुस्लिम समाजाच्या मतविभागणीत अधिक रस दिसतो आहे. एका धर्मपीठाच्या प्रमुखाला व मुख्यमंत्र्याला हे शोभते का? शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या मंत्र्याची हकालपट्टी न करता त्याची पाठराखण करणारे हे कसले पुजारी आहेत ? असा सवालही टिकैत यांनी उपस्थित केला आहे.   

भाजपने मूळ मुद्यांना कितीही बगल देण्याचा प्रयत्न केला तरी जनता बेरोजगारी (Unemployment), महागाई आणि शेतकऱ्यांची थकबाकी, वाढीव वीजबिले, हमीभावाचा कायदा हेच मुद्दे उपस्थित करणार आहे. उत्तर प्रदेशातील जनता याच मुद्यांवर मतदान करेल, असा विश्वासही टिकैत यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान सरकारने संयुक्त किसान मोर्चाला (Sanyukt Kisan Morcha) दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे रविवारी मोर्चाने मिशन उत्तर प्रदेशची घोषणा केली आहे. या पत्रकारपरिषदेत संयुक्त किसान मोर्चाचे नेते  योगेंद्र यादव, हन्नान मौला आदी उपस्थित होते. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्यामुळे संयुक्त किसान मोर्चा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार करणार असून त्याची सुरुवात मेरठपासून होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com