कशी केली जाणार आहे शेतीमध्ये मूल्यवृद्धी ?

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रात मुलवृद्धी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांचा समावेश धोरणात्मक नियोजनात करण्याचा सरकारचा प्रयत्न असून येत्या अर्थसंकल्पात त्याविषयीचे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास सरकारी सूत्रांनी व्यक्त केला आहे.
Sops in Budget 2022 for agri value addition on cards
Sops in Budget 2022 for agri value addition on cards

शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी आत्मनिर्भर बनवण्याची गरज आहे. त्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याची गरजही कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. निर्यात प्रोत्साहन योजना शेतीमाल निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा विचार सरकारकडून करण्यात येतो आहे. अतिरिक्त वाहतूक, विपणन, उत्पादनाची ब्रॅण्डिंग अशा विविधी गोष्टींसाठी या प्रोत्साहनाची गरज आहे. यासाठी एका स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील सहकारी यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, साठवण क्षमता आणि वाहतुकीच्या सुविधांच्या उभारणीसाठी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन ( PIL ) योजनांसाठी  १०,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २०२० च्या आर्थिक वर्षात अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात एकूण गुंतवणुकीच्या १.७ टक्के म्हणजेच २. २४ लाख कोटी रुपयांची मूल्यवृद्धी (GVA )केली होती. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील एकूण मूल्यवृध्दीपैकी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील मूल्यवृद्धी ११ टक्क्यांवर गेलेली आहे. कृषी क्षेत्रातील मूल्यवृद्धी आणि शेतीमाल निर्यातीची प्रक्रिया अशी राबवायला यावी, ज्यामुळे कृषी निर्यात क्षेत्रातील वाढीची वाटचाल शाश्वत पद्धतीने होईल, त्यामुळे भारताने केवळ तांदूळ निर्यातीवर भर देता कामा नये, असे मत (ICRA) या वित्तीय संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनी एकच एका पिकाच्या उत्पादनावर भर न देता पिकांच्या वैविध्यतेतून आर्थिक समतोल साधायला हवा. त्यासाठी कृषी संशोधन आणि विकास प्रक्रियेत आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. शेतकऱ्यांमध्ये मागणीकेंद्रित उत्पादनाचा दृष्टीकोन विकसित होण्यासाठी अपेक्षित योजनांवरही काम सुरु झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  

हेही पाहा- इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी क्षेत्राची कामगिरी सरस आपले प्रत्येक उत्पादन स्थानिक, प्रांतीय न राहता ती जागतिक बाजारातील कमोडिटी आहे, असा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा, सरकारनेही तसे कृषी धोरण राबवण्याची गरज असल्याचे महिंद्रा आणि महिंद्राचे मुख्य अर्थतज्ञ सच्चीदानंद शुक्ला यांनी नमूद केले आहे. अन्न प्रक्रिया उद्योग शेतमालाच्या किरकोळ बाजाराशी जोडून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे थेट मिळवून देण्याची ही वेळ असल्याचेही शुल्काचे यांनी नमूद केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com