Onion Cultivation : रांगडा कांदा पुनर्लागवड तंत्रज्ञान

सध्या रांगडा कांद्याच्या पुनर्लागवडीचा कालावधी सुरू आहे. त्याच प्रमाणे पुढील महिन्यामध्ये रब्बी कांद्याची पुनर्लागवडही सुरू होईल.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon

सध्या रांगडा कांद्याच्या पुनर्लागवडीचा (Rangada Onion Transplantation) कालावधी सुरू आहे. त्याच प्रमाणे पुढील महिन्यामध्ये रब्बी कांद्याची (Rabi Onion) पुनर्लागवडही सुरू होईल. रोपवाटिकेमध्ये (Onion Nursery) रोपे तयार झाल्यानंतर शेतीमध्ये पुनर्लागवड करतेवेळी जमीन सपाट किंवा ठिबक उपलब्ध असलेल्या स्थितीमध्ये गादीवाफ्यावर १५ सेंमी X १० सेंमी अंतरावर रोपांची लागवड करतात. पुनर्लागवडीवेळी अधिक वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. कार्बोसल्फान २ मिलि अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे बुडवून पुनर्लागवड करावी.

Onion Cultivation
Onion Rate : कांदा, लसूण उत्पादक तोट्यात

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

पिकाच्या उत्पादकता वाढीसह जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यासाठी माती परीक्षणानुसार सेंद्रिय, जिवाणू आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.

-कांद्यासाठी नत्र ४० किलो (युरिया ८७ किलो), स्फुरद २० किलो (सिंगल सुपर फोस्फट १२५ किलो) आणि पालाश २० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ३३ किलो) प्रति एकर देण्याची शिफारस आहे. अर्धे नत्र २० किलो (युरिया ४३ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्र २० किलो (युरिया ४३ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने सामान हप्त्याने द्यावे. ठिबक सिंचन पद्धती वापरली असल्यास, लागवडीच्या वेळी एकरी १६ किलो नत्र (युरिया ३५ किलो) द्यावे. उर्वरित २४ किलो नत्र (युरिया ५२ किलो) सहा हप्त्यात विभागून ठिबक संचाद्वारे १० दिवसांच्या अंतराने ६० दिवसांपर्यंत द्यावे. कांदा पुनर्लागवडीच्या वेळी एकरी १६ किलो गंधक (सल्फर) मातीत मिसळून द्यावा.

-माती परीक्षणामध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो/ हे.) मध्यम प्रमाणात असल्यास शिफारशीत खतमात्रा द्यावी. कमी किंवा अत्यंत कमी असल्यास शिफारशीपेक्षा अनुक्रमे २५ टक्के किंवा ५० टक्के अधिक खत मात्रा द्यावी. उपलब्ध अन्नद्रव्ये जास्त किंवा अत्यंत जास्त असल्यास शिफारशीपेक्षा अनुक्रमे २५ % किंवा ५० % कमी खतमात्रा द्यावी.

-रासायनिक खते सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावे. एकरी १०० किलो निंबोळी पेंडही देता येईल.

-कांद्याच्या अपेक्षित उत्पादनासाठी एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे.

-एकरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी* ०.५ ते १ किलो, सुडोमोनास फ्लुरोसन्स* १ किलो, अझोटोबॅक्टर* २ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.)* २ किलो सेंद्रिय खतात एक आठवडा मुरवून द्यावे. ही जैविक संवर्धने रासायनिक खते, कीडनाशक आणि बुरशीनाशकांबरोबर एकत्र देऊ नयेत. साधारणतः पायाभूत रासायनिक खताच्या मात्रेनंतर आठवड्याने द्यावीत. जर जैविक संवर्धने द्रव स्वरूपात असतील तर ठिबक सिंचनाद्वारे देखील देऊ शकतो.

- जमिनीचा सामू ६.५-७.५ दरम्यान असल्यास रासायनिक खतांची उपलब्धता चांगली असते. जमिनीचा सामू ८ पेक्षा जास्त असल्यास गंधक भूसुधारक सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावे. जमिनीचा सामू कमी होऊन बद्ध झालेला स्फुरद उपलब्ध होण्यास मदत होते.

- जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास किंवा पिकामध्ये कमतरतेची लक्षणे दिसल्यास, लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड -४ (लोह ४ %, जस्त ६ % ,मँगेनीज १ %, तांबे ०.५ %, बोरॉन ०.५ %) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणेत फवारणी करता येईल.

- कांदा फुगवण आणि अधिक उत्पादनासाठी, पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी १९:१९:१९ (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) व ६० ते ७० दिवसांनी १३:००:४५ किंवा ०:०:५० (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.

Onion Cultivation
Rabbi Onion : रब्बी कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन

तणनियंत्रण

लागवडीच्या वेळी ऑक्झिफ्लोरफेन (२३.५% ई.सी.) १ ते १.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर गरजेनुसार ३० ते ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.

एकात्मिक मर व करपा रोग व्यवस्थापन

-एकाच शेतामध्ये वारंवार कांदा पीक करणे टाळावे.

- एकरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी* ०.५ ते १ किलो व स्युडोमोनास फ्लुरोसन्स १ किलो सेंद्रिय खतात एक आठवडा मुरवून देणे.

रोपवाटिकेवेळी प्रति किलो बियाणास २ ते ३ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया केलेली असावी.

-मर रोगाच्या नियंत्रणासाठी, मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे आळवणी करावी.

Onion Cultivation
Rabi Onion : रब्बी कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन

-करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, रोपांची मुळे कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मिलि प्रति लिटर पाणी द्रावणात बुडवून लागवड करावी.

-नत्रयुक्त खतांचा वापर शिफारशीत मात्रेत तसेच शिफारशीत वेळेतच करावा.

-करपा रोगाची लक्षणे दिसू लागल्यास, कार्बेन्डाझिम (१२ %) अधिक मॅन्कोझेब (६३ %) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ई.सी.) १ मिलि प्रति लिटर पाणी फवारणी करावी. गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

एकात्मिक फुलकिडी व्यवस्थापन

-फुलकिडे (थ्रीप्स टॅबसी) ही कांदा पीक, बीजोत्पादनातील सर्वाधिक नुकसानकारक प्रमुख रसशोषक कीड आहे.

-पूर्वनियोजित वेळी खोल नांगरणी आणि गरजेनुसार वखरण्या करून, जमीन कडक उन्हात तापू द्यावी. त्यामुळे या किडींचे कोष नष्ट होण्यास मदत होते.

-पुनर्लागवडीआधी १५ दिवस शेताच्या बाजूने मकाच्या दोन ओळी लावाव्यात.

-सुरुवातीच्या काळात पिकामध्ये १५ सेंमी उंचीवर एकरी ४ ते ५ निळे चिकट सापळे (स्टिकी ट्रॅप्स) लावावेत.

-कांदा पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मिलि प्रति लिटर पाणी द्रावणात बुडवून मगच लागवड करावी.

-फुलकिडे नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

फिप्रोनिल (५ ई.सी.) १ मिलि किंवा कार्बोसल्फान (२५ % ई.सी.) २ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि.

एकाच कीटकनाशकांचा वारंवार वापर केल्यास किडींची प्रतिकारक्षमता वाढते. कीटकनाशके आलटून पालटून वापरावीत.

करपा रोग व फुलकीड यांचा एकत्रित नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

पुर्नलागवडीनंतर ३० दिवसांनी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मिलि.

पुढे १५ दिवसांनी दुसरी फवारणी प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मिलि.

पुढे १५ दिवसांनी तिसरी फवारणी कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मिलि.

उत्पादन

रब्बी कांदा जातीपरत्वे, जमीन आणि वातावरणानुसार पुनर्लागवडीनंतर ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होतो. रब्बी कांद्याचे एकरी सरासरी १०-१४ टन उत्पादन येते. एकात्मिक पीक व्यवस्थापनामुळे अनेक प्रगतिशील शेतकरी यापेक्षा दुप्पट उत्पादन घेत असल्याचे दिसून येते.

डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२

(सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग), के.व्ही.के., सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात)

(* कांदा लसूण संशोधन केंद्राची शिफारस.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com