Top 5 News: कापसाच्या उत्पादनात पुन्हा घट!

देशातले कापसाचे भाव सध्या दबावात असले तरी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानेउत्पादन अंदाजात पुन्हा घट केली आहे. याचा कापूस बाजारासाठीचा अर्थ समजून घेऊ थोडक्यात.
cotton production estimates
cotton production estimates

1. राज्याच्या कमाल तापमानातील वाढ (maximum temperature) कायम असल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. तर अनेक ठिकाणी सातत्याने ३५ अंशांच्या अधिक कमाल तापमानाची वाढ होत आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तविली आहे.

Daily Weather Video (Hindi) Dated 26.02.2022 Youtube Link: https://t.co/oOdbHUglv2 Facebook Link: https://t.co/OgNd851bI1

— India Meteorological Department (@Indiametdept)

2. भारत सूर्यफूल तेलासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून आहे. यात युक्रेनचा वाटा जवळपास ८० टक्के आहे. त्यानंतर रशिया आणि अर्जेंटिनाचा नंबर लागतो. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine war) सूर्यफूल तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांचं मत आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धाचे पडसाद जगभरात उमटत असून खाद्यतेल बाजारालाही याचा फटका बसेल. त्यात भारत सूर्यफूल तेलासाठी या दोन देशांवरच अवलंबून आहे. त्यामुळे सूर्यफूल तेलाचे (sunflower oil) दर वाढतील हे नक्की मानण्यात येतंय.

3. इंदौर बाजारात फेब्रुवारीच्या मध्यात हरभऱ्याची आवक (chana arrivals) सुरू होत असते. यंदा मात्र आवकेला जवळपास एक पंधरवड्याचा उशीर झालाय. इन्फॉर्मिस्ट या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आता इंदौरमध्ये हरभऱ्याची आवक सुरू झालीय. पण आवक मालात 12 ते 14 टक्के मॉइश्चर (moisture content) असल्याने अपेक्षित भाव मिळत नाहीयेत. हरभऱ्याच्या मालात जास्तीत जास्त 10 ते 12 टक्के मॉइश्चर अपेक्षित असते. इंदौर हे देशातल्या सर्वात मोठ्या हरभरा बाजारांपैकी एक आहे. पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातही हरभरा आवक सुरू होणार आहे.

4. सांगली आणि तासगाव बाजारात गतवर्षीच्या हंगामातील शिल्लक असलेला बेदाणा (raisin market) बाजारात सौद्यासाठी येत असून, यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मितीस गती आली आहे. नव्या बेदाण्याची आवकही वाढू लागली आहे. तासगाव आणि सांगली बाजार समितीत रोज सरासरी २५० ते ३०० टन बेदाण्याची आवक होत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होळी सण आहे. होळी सणानिमित्त (Holi festival) बेदाण्याची खरेदी महिन्यापूर्वीच झाली आहे. सध्या नवीन दर्जेदार बेदाण्याची फारशी आवक नसली, तरी दर टिकून आहेत. पुढील आठवड्यात दर्जेदार बेदाणा बाजारात येईल. त्या वेळी खरेदीदारांची संख्या वाढून विक्रीदेखील अपेक्षित होईल, अशी शक्यता आहे.

हा व्हिडिओ पाहिलात का? :  

5. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (CAI) 2021-22 मध्ये देशांतर्गत कापूस उत्पादनात पुन्हा एकदा घटीचा अंदाज व्यक्त केलाय. यापूर्वीच्या अंदाजात पाच लाख कापूस गाठींची कपात करत भारतात यंदा 343 लाख गाठींचं उत्पादन होईल, असं संघटनेनं म्हटलंय. याआधी देशात 348 लाख कापूस गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. एक कापूस गाठ (cotton bale) 170 किलो रुईची बनलेली असते. सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांच्या मते, “गुजरातमध्ये दोन लाख, तेलंगाणा-कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक लाख, तर आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 50,000 गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता आहे.” गेल्या खरिपात राज्यात आणि देशात कापूस फुटण्याच्या अवस्थेत असताना पाऊस झाला. यात राज्यातल्या कापसाचं नुकसान झालं. तर पंजाब आणि हरियाणाच्या कापूस उत्पादक पट्ट्यात गुलाबी बोंडअळीचा (pink bollworm) मोठा प्रादुर्भावही झाला होता. त्याचाही परिणाम देशांतर्गत कापूस उत्पादनावर झालाय. तर महाराष्ट्रासहीत गुजरात, तेलंगाणा, आणि कर्नाटकमध्ये कापूस उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकते. त्यामुळे एकूण उत्पादन अंदाज घटवण्यात आलाय. या हंगामात कापसाचा वापर 5 लाख गाठींनी घटून 340 लाख गाठींवर येण्याची शक्यता आहे. असं असलं तरी हंगाम संपताना 48 लाख कापूस गाठी शिल्लक राहतील. गेल्या हंगामात हाच आकडा 75 लाख इतका होता. रशियानं युक्रेनवर लादलेल्या युद्धाच्या परिणामी कापूस बाजार सध्या दबावात आहे. तरी मूलभूत परिस्थिती पाहता दर रिकव्हर होतील, असा जाणकारांचा होरा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com