Summer Heat : तापमानात चढ-उतार; उन्हाच्या झळा

Summer Season : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहे.
Summer Heat
Summer Heat Agrowon

Weather Update Pune : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र उन्हाचा चटका कायम असल्याने विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहे.

पावसाला पोषक हवामान झाल्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २४) उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. २२) नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, परभणीसह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३ तापमानाची नोंद झाली. वाशीम, जळगाव, परभणी, अमरावती, चंद्रपूर येथे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे आहे.

Summer Heat
Summer Heat : उन्हाच्या झळांनी चटका, उकाड्यात वाढ

कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३६ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. पावसाला पोषक हवामान होताच, राज्याच्या कमाल तापमानात चढ - उतार होऊ लागले आहेत. कोकणासह राज्यात उष्ण व दमट हवामानामुळे घामाच्या धारा वाहत आहेत. बिहार आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Summer Heat
Monsoon Update IMD 2023 : मॉन्सून शुक्रवारपर्यंत अंदमानात दाखल होणार; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

विदर्भापासून मराठवाडा, अंतर्गत कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता. २४) उष्ण व दमट हवामानामुळे राज्यात चटका कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Summer Heat
El Nino Impact on Agriculture : एल निनोच्या काळात शेतीसाठी नियोजन कसं कराव?

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.१ (२२.८), जळगाव ४२.४ (२६.८), धुळे ४१, कोल्हापूर ३६.६ (२२.९), महाबळेश्‍वर ३२.९ (२०.७), नाशिक ३७.५ (२२.८),

निफाड ४० (२४.१), सांगली ३९.३ (२५.३), सातारा ३९.७ (२५.८), सोलापूर ४१.६ (२७.८), सांताक्रूझ ३३.७ (२७), डहाणू ३४.४ (२८), रत्नागिरी ३४.४ (२७.५),

छत्रपती संभाजीनगर ४०.८(२३.२), नांदेड ४१.२ (२८.४), परभणी ४२ (२७.४), अकोला ४३ (२८.७), अमरावती ४२(२५.१), बुलडाणा ४१.२ (२६.८), ब्रह्मपुरी ४१ (२५.६),

चंद्रपूर ४२ (२८), गोंदिया ३९.२ (२४), नागपूर ४१.६ (२३.३), वर्धा ४०.४ (२५.१), वाशीम ४२.६ (२५.६) यवतमाळ - (२५.२).

मॉन्सूनची प्रगती नाही

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाले. मंगळवारी (ता. २३) मॉन्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती झाली नाही. दोन दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान बेटांच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com