milk adultertaion
milk adultertaion

पाणी टाकल्याने दुधात काय बदल होतात?

दूध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर आहे, मात्र प्रति जनावर दूध उत्पादनक्षमता कमी आहे. सततची वाढणारी लोकसंख्या आणि त्याच प्रमाणात कमी होणारी चारा, लागवडीयोग्य जमीन यामुळे पशुपालन क्षेत्रावर मर्यादा येत आहेत. यासाठी प्रति जनावर उत्पादकता वाढविली पाहिजे.

दूध उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर आहे, मात्र प्रति जनावर दूध उत्पादनक्षमता कमी आहे. सततची वाढणारी लोकसंख्या आणि त्याच प्रमाणात कमी होणारी चारा, लागवडीयोग्य जमीन यामुळे पशुपालन क्षेत्रावर मर्यादा येत आहेत. यासाठी प्रति जनावर उत्पादकता वाढविली पाहिजे.

भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण दुधापैकी फक्त ४० ते ४२ टक्के दूध हे संघटित (organized)  क्षेत्राकडून येत असते. उर्वरित दूध (milk) हे स्थानिक रतीब किंवा उकड्यांमार्फत  विकले जाते. भारताचे एकूण दूध उत्पादन हे १९८ दशलक्ष मेट्रिक टन (metric ton)  इतके असेल तरी अजूनही काही ग्रामीण भागात दुधाची कमतरता (deficiency) दिसून येते.

हेही पाहा-  दुधातील SNF म्हणजे काय?

सध्याची दुग्धव्यवसायिकांची परिस्थिती पाहता, पशुखाद्याच्या किंमती सतत वाढत आहेत. मात्र दुधाचे भाव त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीत. याउलट मागील १-२ वर्षापासून हे भाव स्थिर आहेत. दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक पशुपालक दुधात पाणी टाकण्याचा प्रकार करतात.

दुधात पाणी (water) मिसळणे (adulteration) ही मुळातच चुकीची संकल्पना आहे. पण टाकले जाणारे पाणी चांगल्या प्रतीचे, पिण्यायोग्य असल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाहीत. याउलट हे पाणी गटारीतील, नाल्यातील असल्यास त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येतात.

दुधात पाणी टाकल्याने दुधात काय फरक पडतो ?

दुधाचे आकारमान वाढविण्यासाठी दुधात पाण्याची भेसळ केली जाते. आपण लॅक्टोमीटरचा (lactometer) वापर करून ही भेसळ सहज ओळखू शकतो. दुधाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. गायीच्या आणि म्हशींच्या दुधाची घनता ही अनुक्रमे १.०२८ ते १.०३० आणि १.०३२ ते १.०३४ इतकी असते. याउलट पाण्याची घनता ही १ इतकी असते. पाण्याची घनता दुधाच्या घनतेपेक्षा कमी असल्याने दुधाची एकूण घनता ही कमी झालेली दिसून येते.

कमी झालेली घनता लॅक्टोमीटरचा वापर करून काढता येते तसेच दुधाच्या गोठण बिंदूवरून  (freezing point) पाण्याची भेसळ ओळखणे शक्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com