गिरिराज कोंबडी देते इतक्या अंड्याच उत्पादन

ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी, रोजगाराच्या चांगली संधी म्हणून तसेच प्राणीजन्य प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून कोंबडीपालन एक चांगला व्यवसाय आहे
giriraj poultry
giriraj poultry

ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी, रोजगाराच्या चांगली संधी म्हणून तसेच प्राणीजन्य प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून कोंबडीपालन एक चांगला व्यवसाय आहे. या व्यवसायाचे योग्य व्यवस्थापन योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षभर उत्पन्न मिळण्याची संधी उपलब्ध असते.

हेही वाचा- गिरिराज, ब्लॅक ॲस्ट्रॉलार्प ठरताहेत ‘फेव्हरेट’

गिरिराज कोंबडीची वैशिष्ट्ये – - गिरिराज कोंबडी आपल्याकडील इतर गावठी कोंबड्यांप्रमाणे (hen) विविध रंगांत आढळतात. - या जातीच्या कोंबड्या कोणत्याही वातावरणात एकरूप होऊन जातात. - यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. - या कोंबड्या मांस (chicken) तसेच अंडी उत्पादनासाठी वापरल्या जातात. दोन महिन्यात एक किलोपर्यंत वजन मिळते. - एका वर्षात १६० ते १८० मिळत असतात. - अंडी (eggs) वर्षाकाठी १६० ते १८० मिळतात.

पिल्ले ते कोंबड्या विक्रीस योग्य होईपर्यंत आहाराचे योग्य व्यवस्थापन तसेच वेळेत लसीकरण (vaccination) केल्यास या पक्ष्यांपासून चांगला आर्थिक मोबदला मिळू शकतो.  पक्ष्यांची एकदिवसीय पिल्ले विकत आणल्यानंतर त्यांना प्रवासाचा ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी इलेक्‍ट्रॉल (electrol) पावडरचे द्रावण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे. दुसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून अॅन्टिबायोटिक (antibiotic) द्यावे लागते. हेही वाचा- परसबागेतील कुक्कुटपालनासाठी वनराज कोंबड्या सुरवातीला एक- दोन दिवस भरडलेला मका द्यावा. त्यानंतर चार आठवडे स्टार्टर (starter) खाद्य द्यावे. नंतर चार आठवडे फिनिशर खाद्य द्यावे. तसेच आठ आठवड्यांनंतर खाद्य देत राहिल्यास त्याच प्रमाणात त्यांची वाढ होत राहते. ही कोंबडी मांंस उत्पादनासाठी चांगली वाव असल्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com