योगींच्या गडाला भगदाड ?

राज्याच्या एकूण ४०३ विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे.आतापर्यंत पाच टप्प्यात २९२ जागांवर मतदान झाले आहे. आज ५७ मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. शेवटच्या सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी ५४ मतदारसंघात मतदान होणार आहे.
UP Assembly Elections
UP Assembly Elections

उत्तर प्रदेश विधानसभा (Uttar Pradesh Assembly Elections )निवडणुकीतील सहाव्या टप्प्यात गुरुवारी  (दिनांक ३ मार्च) मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.३१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.  १० जिल्ह्यांतील ५७ मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया (Voting) पार पडले. सहाव्या टप्यातील ५७ मतदारसंघात ६७६ उमेदवार मैदानात उभे होते.  

राज्याच्या एकूण ४०३ विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे.आतापर्यंत पाच टप्प्यात २९२ जागांवर मतदान झाले आहे. आज ५७ मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. शेवटच्या सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी ५४ मतदारसंघात मतदान होणार आहे.  

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या गोरखपूरसह आंबेडकरनगर, बालिया, बलरामपूर, बस्ती, देवरिया, कुशीनगर,  संत कबीर नगर, सिद्धार्थ नगर आणि महाराजगंज या १० जिल्ह्यांतील ५७ मतदारसंघातील मतदारांनी आज आपला मताधिकार बजावला आहे. ५७ जागांपैकी ११ जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत.

मुख्यमंत्री योगींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

सहाव्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (J.P.Nadda), समाजवादी पार्टी (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav), काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक स्टार प्रचारकांनी प्रचार केला आहे.

या टप्प्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असलेले मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपूर देखील आहे. योगी यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या सुभावती शुक्ला आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक उमेदवार मैदानात आहेत.  गोरखपूर हा भाजपचा अभेद्य गड मानला जातो. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात या मतदारसंघातून १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

व्हिडीओ पहा- 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)१९९८ ते २०१७ पर्यंत गोरखपूर मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. १९९८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपचे उमेदवार म्हणून येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते अगदी कमी फरकाने विजयी झाले होते. पण त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाचे अंतर वाढत गेले. १९९९, २००४, २००९, २०१४ मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com