Ajit Pawar: अजित पवार यांच्याकडून गोगलगायीने केलेल्या नुकसानाची पाहणी

अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी उध्वस्त केलेल्या पिकाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. (Ajit Pawar Vist Farmer)
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

मागील दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विदर्भ-मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यावेळी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी उध्वस्त केलेल्या पिकाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार धनंजय मुंडेही (Dhananjay Munde होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अजित पवार यांनी शंखी गोगलगायींनी केलेल्या नुकसानासाठी आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करण्याचे आश्वसान दिले.

राज्यातील विविध भागात पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. मात्र कमाल आणि किमान तापमानासह उकाड्यात वाढ झाली आहे. या दमट वातावरणामुळे शंखी गोगलगायींची (Snail) संख्या वाढली आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या भागात सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) पिकांमध्ये शंखी गोगलगायींनी धुमाकूळ घातला आहे. परिणामी राज्यातील मराठवाडा, विदर्भातील शेतकरी हैराण झाले आहेत.

काही शेतकऱ्यांनी शंखी गोगलगायींच्या त्रासामुळे दोनदा-तीनदा पेरणी केली. मात्र तरीही शंखी गोगलगायी पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळे यंदाचे खरीप पीक हातून जाते की, काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजित पवार यांना निवेदन दिले आहे.

यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलैमध्ये चांगला पावसाने हजेरी लावली त्यामुळे वातावरण दमट झाले. परिणामी मिलिपीडसाठी म्हणजे पैसा, वाणू, गोगलगायीची संख्या झपाट्याने वाढली.

दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. सोयाबीन कापसाच्या कोवळ्या पानावर या किडीने हल्ला चढवला. ज्यामुळे राज्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. दुबार पेरणीचं संकटही यामुळे ओढावलं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com