Agricultural Exhibition : सांघिक प्रयत्नातून आदिवासींचा विकास साध्य

कृषी विद्यापीठ तथा पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे विषयतज्ज्ञ, महाबीज, मेळघाट मित्रपरिवार, पाणी फाउंडेशन तथा इतर संस्थांच्या प्रतिनिधीसह शेकडो आदिवासी उपस्थित होते.
Agricultural Exhibition
Agricultural ExhibitionAgrowon

Akola News : आपली प्रामाणिकता, मेहनत आणि सचोटीने स्वतंत्र अस्तित्व जोपासणाऱ्या मात्र विकासापासून वंचित असणाऱ्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांना (Tribal Families) त्यांची संस्कृती, नैसर्गिक तथा सेंद्रिय पीक पद्धती (Organic Farming) जोपासत शाश्वत विकासाकडे अग्रेसित करू, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी केले.

यासाठी कृषी विद्यापीठासोबतच विविध शासकीय, निमशासकीय विभाग तथा सेवाभावी व खासगी संस्थांच्या सांघिक प्रयत्नातून हे काम पुढे नेऊ असेही सांगितले.

अति दुर्गम ग्रामपंचायत हतरू अंतर्गत ग्राम चिलाटी येथे कृषी विद्यापीठ आणि मैत्री ग्रुप (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाटातील आदिवासी कुटुंबांचे सामाजिक व आर्थिक उन्नती प्रकल्पातंर्गत आयोजित आदिवासी शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

Agricultural Exhibition
Agriculture Exhibition : नारायणगाव केव्हीकेत ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शन

याप्रसंगी गट ग्रामपंचायतीचे सरपंच सुमित्रा बेठेकर, उपसरपंच भैय्यालाल मावसकर, मैत्री ग्रुपचे अनिल शिदोरे, राहुल धर्माधिकारी, शिरीश जोशी यांच्यासह विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आम्रपाली आखरे, तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी व्यासपिठावर उपस्थित होते.

कृषी विद्यापीठ तथा पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे विषयतज्ज्ञ, महाबीज, मेळघाट मित्रपरिवार, पाणी फाउंडेशन तथा इतर संस्थांच्या प्रतिनिधीसह शेकडो आदिवासी उपस्थित होते.

अश्विनी धर्माधिकारी यांनी मैत्री ग्रुपने मेळघाटातील आदिवासींसाठी दिलेले योगदान मांडले.

Agricultural Exhibition
Agrowon Agricultural Exhibition : औरंगाबादमध्ये १३ जानेवारीपासून ‘अॅग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन

शिक्षण विस्तार शिक्षण संचालनालय, तेलबिया, कडधान्य व ज्वारी संशोधन विभाग, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र तथा बियाणे संशोधन व तंत्रज्ञान विभागासह पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, महाबीज, मेळघाट मित्रपरिवार, मैत्री परिवार, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जारीदा आणि पाणी फाउंडेशनची दालने होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन शिंदे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com