
Sindhudutg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आखवणे, भोम (ता. वैभववाडी) परिसराला मंगळवारी (ता. ११) सायकांळी चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये पाच घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान वीज पडल्यामुळे गवताची गंजी जळून खाक झाली.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान वैभववाडी तालुक्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही भागात गारांचा पाऊस झाला.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे.
मंगळवारी सायकांळी जिल्ह्यातील आखवणे, भोम परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये आखवणेतील पाच घरांची पडझड झाली.
चक्रीवादळात आखवणेतील अंकुश नागप, तानाजी पडीलकर, राजेंद्र गुरव, मनोहर नागप, तर भोम येथील बाबाजी बांद्रे यांच्या घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
भोम गुरववाडी येथील बयाजी ढवण यांच्या गवताच्या गंजीवर वीज कोसळ्यामुळे गंजी जळून खाक झाली. तालुक्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.
वैभववाडी शहरात तासभर पाऊस सुरू होता. तर मांगवली, वेंगसर या भागात गारांचा पाऊस झाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.