Water Scheme : ‘आरफळ’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

आरफळ योजनेत कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव हे चार तालुके समाविष्ट आहेत.
Water Scheme
Water Scheme Agrowon

Sangli Water Scheme News : गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शेतीच्या पाण्याची टंचाई (Water Shortage) भासण्याचे संकेत मिळत आहेत. विहिरी, कूपनलिकांनी आताच तळ गाठल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे तासगाव, खानापूर, कडेगाव, तसेच पलुस तालुक्याच्या काही भागांत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे आरफळ योजना सुरू (Arafal Water Scheme) करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

आरफळ योजनेत कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव हे चार तालुके समाविष्ट आहेत. या तालुक्यांतील ३७ गावांना सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फायदा होतो. त्यामुळे या तालुक्यात ऊस पिकासह अन्य पिकांच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.

दरवर्षी आरफळ योजना सुरू केली जाते. आरफळ योजनेचे पाणी येरळा नदीत सोडले जाते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते.

सध्या या तिन्ही तालुक्यांतील मध्यम व लघु प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा आहे; मात्र, वाढत्या उन्हामुळे हा पाणीसाठा कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

Water Scheme
Water Management : पाण्यासाठी दाही दिशा, फिरविशी आम्हा जगदिशा

ताकारी योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे याच तालुक्यांना दिसाला मिळाला आहे. मात्र, ताकारी योजनेपासून अनेक गावे वंचित आहेत. या वंचित गावांना आरफळ योजनेचे पाणी दिले जाते. त्यामुळे येथील द्राक्ष, ऊस शेतीला या योजनेचे शाश्वत पाणी मिळाले आहे;

मात्र, आरफळ योजना सुरू झाली नसल्याने या योजनेच्या लाभ क्षेत्रात असलेल्या गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे आरफळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी होत आहे; मात्र, पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पाणीटंचाईची शक्यता

या तिन्ही तालुक्यांत संपूर्ण क्षेत्र बागायत असल्याने शेतीला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. मात्र, यावर्षी आतापासूनच विहिरी, कूपनलिकांना पाणी कमी झाल्याने शेतीला तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.

Water Scheme
Pauas : अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले

‘आरफळ’च्या पाण्यामुळे ओलिताखाली येणारे क्षेत्र

तालुका - गावांची संख्या - क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कडेगाव ४ ४७०

खानापूर ६ १९६०

पलूस ६ २३६९

तासगाव २१ ११९५९

एकूण ३७ १६७५८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com