Farmers Protest : शेतकरी संघटनेचे झेडपीसमोर आंदोलन

शासनाने मात्र अजूनही ही भरपाई खात्यात जमा केली नाही. या मुद्द्याबाबत शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता.
Zilha Parishad
Zilha ParishadAgrowon

Akola Zilha Parishad Protest : जिल्ह्यात सन २०२२ मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पिकांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान (Farmer Loss) झाले. याची भरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती.

मात्र, याची मदत अद्यापही खात्यात जमा न झाल्याने शेतकरी संघटनेने बुधवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Farmer Protest) केले. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर, विलास ताथोड, अविनाश नाकट, नीलेश नेमाडे यांच्यासह शेतकरी संघटनेच्या महिला, पुरुष कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने जे नुकसान झाले होते. तेव्हा शासनाने मदत जाहीर केली होती. या मदतीसाठी याद्या तयार करण्यात आल्या.

Zilha Parishad
Farmer Protest : राज्यभर स्वाभिमानीच्या चक्काजामला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

शासनाने मात्र अजूनही ही भरपाई खात्यात जमा केली नाही. या मुद्द्याबाबत शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी शेकडो कार्यकर्ते अकोल्यात दाखल झाले.

अशोक वाटिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. तेथे शासनासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी जिल्ह्यातील याद्या तयार झाल्या असून शासनाकडे पाठवण्यात आल्या आहेत. शासनाकडून हा निधी थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगितले.

Zilha Parishad
Farmer Protest : शेतीप्रश्न सोडवण्यासाठी ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर

यावेळी अतुल टवलारे, कंचन जामडे, रमण निचड, मुकुंद अप्पा तेल्हारकर, नारायण माहेवार, महेंद्र मुऱ्हेकार, संगीता टवलारे, योगिता केदार, शालिनी सोनटक्के, किरण कौठकर, पूजा गणोरकर, सुप्रिया लांडे, आशा नेमाडे, नंदा पटेल, पुष्पा चवरे, इंदू राऊत, योगिता बाहेवार, सविता निचड, वैशाली तळोकार, कांचन मोहोड, किरण सावळे, रेखा नागापुरे, पूजा कटारे, वंदा झुलारी, संगीता सुपासे, सुनीता सुपसे, जयश्री सुपासे, मंगला चांदेकर, माया वानखडे, देविका शेळके, राजकपूर पवार, मीना सवरागडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com